राष्ट्रवादीची भाजपला मदत, काँग्रेस नेत्यांचा 'एकला चलो रे'चा नारा

राष्ट्रवादीची भाजपला मदत, काँग्रेस नेत्यांचा 'एकला चलो रे'चा नारा

maharashtra assembly election : विधानसभेसाठी काँग्रेस स्वबळावर लढण्यास आग्रही असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, सागर कुलकर्णी, 7 जून : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ता दोन्ही पक्षांनी चिंतन बैठका घेत पराभवाची कारणं शोधायला सुरूवात केली आहे. शिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीकरता देखील तयारी सुरू केली आहे. पण, काँग्रेसनं घेतलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सूर निघाला. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असा सूर देखील या बैठकीमध्ये निघाला. तर, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यापेक्षा वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी अशी मागणी यावेळी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी केली. सुत्रांनी याबबतची माहिती दिली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेस 1 तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागांवर विजय मिळाला. शिवसेना – भाजपनं विधानसभेसाठी देखील युतीची घोषणा केली आहे. पण, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत मात्र अद्याप तरी कोणतीही ठोस अशी घोषणा झालेली नाही.

वंचितचा आघाडीला फटका

लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फटका बसला. अनेक मतदारसंघात मतांची आकडेवारी पाहता प्रथमदर्शनी तरी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला वंचितचा फटका बसल्याचं दिसून येतं. त्यामुळे विधानसभेसाठी काय राजकीय गणितं असणार याबद्दल आता राजकीय तर्क – वितर्क लढवले जात आहेत.

भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीची गुंडगिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

First published: June 7, 2019, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading