यंदाच्या विधानसभेचं चित्र ठरवणार 'हे' 5 तरुण चेहरे

विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांतील तरुण चेहऱ्यांकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरीही निवडणूक रणधुमाळी सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून प्रतिस्पर्ध्यांवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. जुन्या जाणत्या नेत्यांनी आपले डावपेच खेळायला सुरुवात केली असली तरीही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांतील तरुण चेहऱ्यांकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

आदित्य ठाकरे - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. या यात्रेत त्यांना तरुणांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील, अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते नेमके कोणत्या मुद्द्यांसह विरोधकांना घायाळ करणार, हे पाहावं लागेल.

आदित्य ठाकरे- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. या यात्रेत त्यांना तरुणांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील, अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते नेमके कोणत्या मुद्द्यांसह विरोधकांना घायाळ करणार, हे पाहावं लागेल.

रोहित पवार - राज्यभरात राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार मोठ्या हिरिरीने विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. रोहित पवार हे भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कर्जत जामखेडमध्ये नगरचे पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांना आव्हान देणार आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला उद्धवस्त करण्यासोबतच राज्यभरातील राष्ट्रवादीच्या तरूण कार्यकर्त्यांना विश्वास देण्यात ते यशस्वी ठरतात का, हे पाहावं लागेल.

योगेश टिळेकर - लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षातील नेते आपल्याकडे खेचत भाजपने कुरघोडी केली. त्यामुळे भाजपसाठी यंदाच्या निवडणुकीत अनुकूल वातावरण असल्याचा दावा पक्षनेतृत्वाकडून केला जात आहे. अशावेळी तरूण मतदाराला आपल्या खेचत भाजपला मोठं यश मिळवून देण्याची जबाबदारी भाजयुमोचे अध्यक्ष असलेल्या योगेश टिळेकर यांच्यावरही असणार आहे. तसंच हडपसर विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत विजय मिळवलेले टिळेकर पुन्हा एकदा विधानसभा गाठण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते कशी कामगिरी करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सत्यजीत तांबे - राज्यभरात झालेलं आऊटगोईंग काँग्रेससाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक जुने नेते पक्ष सोडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेसला अच्छे दिन आणण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांना बळ देण्यात ते यशस्वी ठरतात का, हे तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

संदीप क्षीरसागर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या बीड दौऱ्यावेळी जिल्ह्यातील 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यावेळी पवार यांनी बीडमधून राष्ट्रवादीचा तरुण चेहरा असणाऱ्या संदीप क्षीरसागर यांना संधी दिली आहे. त्यांची लढाई आधी राष्ट्रवादीत असणाऱ्या आता भाजपमध्ये दाखल झालेले त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात असणार आहे. त्यामुळे हे आव्हान ते कसं पेलवणार, याबाबत उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या