मतदानासाठी या 11 पैकी कुठलंही ओळखपत्र चालणार, निवडणूक आयोगाने दिली यादी

मतदानासाठी या 11 पैकी कुठलंही ओळखपत्र चालणार, निवडणूक आयोगाने दिली यादी

मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. ते नसल्याच कुठलं ओळखपत्र चालेल याची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे.

  • Share this:

मुंबई,21 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक आहे. ते नसल्यास कुठलं ओळखपत्र चालेल याची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती (मतदारांना मिळणारी स्लिप) ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असंही निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

मतदानाचा  हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे. मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसेल तर मतदाराने खालील पैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदार केंद्रावर सादर करावे.

1.    पासपोर्ट (पारपत्र)

2.    वाहन चालक परवाना - Driving Licence

3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,

सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे आयकार्ड)

4.    छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक

5.    पॅनकार्ड (PAN card)

6.    राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती

निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड

7.    मनरेगा जॉबकार्ड

8.    कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

9.    छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

10.    खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

11.    आधारकार्ड (Aadhar)

वाचा - मतदार यादीत नाव आहे की नाही, हे कसं शोधाल? मतदानकेंद्राचीही मिळेल माहिती

केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत  आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. याबाबत मतदारांनी आपले नाव नोंदणी अथवा पडताळणीसाठी www.nvsp.in   या संकेतस्थळावर भेट द्यावी.

यंत्रणा सज्ज

मतदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीची व्यवस्था (Counting day) वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलही सज्ज आहे.

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

•    मतदारांना मतदार यादीत नाव आहे की नाही याची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल.

•    या वेबसाईटवर इथे क्लिक करा. स्वतःचे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या नावाची  माहिती मिळते. मतदाराचं नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या गोष्टी दिलेल्या कॉलममध्ये भरल्यानंतर माहिती मिळू शकते.

•  याशिवाय मतदार ओळख क्रमांक आणि राज्याचं नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याचा दुसरा पर्यायही संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वाचा अन्य बातम्या

चांद्रयान - 2 बद्दल चांगली बातमी, यानाने पाठवला चंद्राचा पहिला प्रकाशमान फोटो

मुलाला 'मोदी जी' म्हणायला शिकवतेय अभिनेत्री, VIDEO पाहून पंतप्रधान म्हणाले...

कोट्यवधी ग्राहकांचा मोबाइल क्रमांक होऊ शकतो बंद, 31 ऑक्टोबरपर्यंतचीच आहे मुदत

कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स, काय म्हणाले उदयनराजे? पाहा VIDEO

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 19, 2019, 7:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading