विश्वजीत कदमांकडून पहिल्यांदाच चंद्रकांत पाटलांवर पलटवार

विश्वजीत कदमांकडून पहिल्यांदाच चंद्रकांत पाटलांवर पलटवार

चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर पलटवार करत काँग्रेस कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई 18 जुलै : 'काँग्रेसच्या पाचपैकी एका कार्याध्यक्षाने भाजपमध्ये प्रवेश केला तर आश्चर्य वाटायला नको,' असं म्हणत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिली. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यावर पलटवार करत काँग्रेस कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी जोरदार टीका केली आहे.

'चंद्रकांतदादांचं वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही. आताच त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी निवड झाली आहे. ते राज्याचे ज्येष्ठ मंत्रीदेखील आहेत. असं असताना त्यांनी केलेलं हे वक्तव्य केवळ हस्यास्पद आहे,' अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

चंद्रकांत पाटलांनी स्वीकारला प्रदेशाध्यपदाचा कार्यभार

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन काल आपली भूमिका स्पष्ट केली. भाजप आणि शिवसेनेत135 /135 असं जागावाटप असलं तरी घटक पक्षांना जागा द्यावा लागतील. 'युती'चं जागावाटप हळूहळू उलगडत जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, मी परिपूर्ण आहे असं नाही. उपलब्ध असलेल्यांपैकी मी एक आहे, मी पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री झालंच पाहिजे असं काही नाही. मी कोरं पाकीट आहे, पक्षाचे नेते जो पत्ता पाकिटावर टाकतील तेथे तेथे मी जाईल. निवडणूक ही प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांची संयुक्त जबाबदारी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

चंद्रकांत दादांनी बारामतीला थेट आव्हान दिलं होतं त्यामुळे त्यांना त्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, आज बारामती विधानसभा जागा जिंकणं अशक्य आहे. यापुढच्या काळात बारामतीचं घर अधिक मजबूत करणार आहे. 2024 ची निवडणूक ही बारामतीसाठी असेल. EVM घोटाळा असता तर बारामती जिंकलो असतो असंही ते म्हणाले. ज्यांना EVM मशिन्सबाबत तक्रार करायची असेल त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं असा सल्लाही त्यांनी दिला.

सेमीफायनलला धोनी मुद्दामहून बाद झाला, स्टार क्रिकेटरच्या वडिलाचा गंभीर आरोप

First published: July 18, 2019, 8:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading