शरद पवारांनी 2014 मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगतोय - उद्धव ठाकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टार्गेट केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 06:56 AM IST

शरद पवारांनी 2014 मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगतोय - उद्धव ठाकरे

मुंबई, 20 ऑगस्ट : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये मोठी मेगाभरती सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मोठमोठ्या नेत्यांचं आऊट गोईंग काही थांबलेलं नाही. म्हणजे युतीकडून विरोधी पक्षांना खिंडार लावण्याचं काम सध्या जोरात चाललं आहे. या राजकीय घडामोडींवरूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सणसणीत टोला हाणला आहे.

'जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळय़ांच्या जोरावर पक्षबांधणी करू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला, पण जे कावळे उडाले त्या कावळय़ांना इतर पक्षांच्या पिंजऱयातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता. राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन या कावळय़ांचे मावळे होऊ शकले नाहीत. कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीका केली आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- शिवसैनिकांनी संकटकाळी जी भाषा वापरली तीच भाषा वापरून पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जा देण्याचे काम पवार करीत आहेत. - काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आभाळ फाटल्याप्रमाणे गळती लागली आहे. भगदाड, खिंडार हे शब्द तोकडे पडतील असा ‘लोट’ बाहेर पडत आहे.

- शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सांगितले, ‘चिंता करू नका. उडाले ते कावळे!’ पवार यांच्याविषयी महाराष्ट्राला आदर आहे, पण राजकारणातली त्यांच्याविषयी असलेली भीती संपली आहे.

Loading...

(वाचा :ED ची नोटिस : राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला 'हा' आदेश)

- काँग्रेस पक्षातून बरेच लोक भाजपात येत आहेत. हा ‘गळीत’ हंगाम फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सुरू आहे. बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, तेलुगू देसम अशा पक्षांतील लोक भाजपात उडय़ा मारीत आहेत.

- महाराष्ट्रातही या ‘गळीत’ हंगामाने जोर धरला असून काँगेस-राष्ट्रवादीतले दिग्गज लोक भाजप किंवा शिवसेनेत एका पायावर येण्यास तयार आहेत. नारायण राणे आधी शिवसेनेत होते. ते काँग्रेसमध्ये गेले. तेथून ते भाजपात गेले. राणे यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळय़ातही श्री. पवार यांनी सध्या पक्षांच्या चिठ्ठय़ा टाकून लोक पक्षबदलाबाबत कसे निर्णय घेतात यावर भाष्य केले.

(वाचा : राज ठाकरेंना 'ईडी'ची नोटीस; काही तासातच मनसेनं मागे घेतला हा निर्णय)

-गेल्या तीन महिन्यांत, विशेषतः लोकसभेच्या ‘बंपर’ निकालानंतर महाराष्ट्रातील काँगेस पक्षाचा खुराडा रिकामा झाला, तर राष्ट्रवादीच्या गोठय़ातूनही अनेक दुभती जनावरे ‘दावणी’ तोडून बाहेर पडत आहेत. हे असे का घडत आहे?

- राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, चारा, वैरण खाऊन या कावळय़ांचे मावळे होऊ शकले नाहीत. कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले. असे अनेक कावळे शिवसेनेतून उडून गेले. तेव्हा ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ या मंत्रावर शिवसेना उभी राहिली.

- 370 कलम हटवले म्हणून साऱया देशात आनंदी आनंद असताना ‘370’च्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादीने उभे राहणे हे कसले धोरण?

(पाहा : राज ठाकरेंसाठी अजित पवार, धनंजय मुंडे फडणवीस सरकारवर कडाडले, पाहा हा VIDEO)

- 2014 मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सरकार बनविण्याचे आमंत्रण देणारे कावळे राष्ट्रवादीचेच होते. हा चोंबडेपणा करण्याची तशी गरज नव्हती. राष्ट्रवादीच्या कावळय़ांनी तेव्हा ही फालतू ‘काव काव’ केली नसती तर पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते, पण पवारांनी 2014 मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगीत आहे.

- महाराष्ट्रात ‘युती’ला जिथे गरज आहे तिथे नव्या मावळय़ांचे स्वागत होईल. उडून जाणारे कावळे आम्हाला नकोत. ‘युती’चा फॉर्म्युला ठरला आहे. महाराष्ट्राचा विकास आणि जनतेचे कल्याण या एकमेव अजेंडय़ावर सत्ता आणि जागांचे वाटप समान तत्त्वावर होईलच होईल. राज्य मावळय़ांचेच असेल.

निवडणुकीआधीच सेनेला झटका, करमाळ्याच्या राजकारणाने बदलले वारे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 06:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...