विधानसभा निवडणुकांची काँग्रेसची पहिली यादी तयार, 'या' तारखेला होणार घोषणा!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सेवाग्राम किंवा धुळ्यामधून फुटण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 06:51 PM IST

विधानसभा निवडणुकांची काँग्रेसची पहिली यादी तयार, 'या' तारखेला होणार घोषणा!

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 5 सप्टेंबर : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या छाननी समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जवळपास 66 नावांवर  अंतिम निर्णय घेण्यात आला. येत्या 10 सप्टेंबरला या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सेवाग्राम किंवा धुळ्यामधून फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस 138, राष्ट्रवादी 138, आणि 12 जागा मित्रपक्षांना देण्याबाबत चर्चा. मित्र पक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस आपल्या खात्यातील जागा सोडण्यास तयार आहे. 10 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची चर्चा देखील पूर्ण होणार असून त्याच दिवशी छाननी समितीची पुन्हा बैठक होणार आहे.

कोल्हापूर दक्षिणच्या 'आखाड्या'त रंगणार पाटील विरुद्ध महाडीक असा सामना!

हर्षवर्धन पाटलांना लोकसभा निवडणुकीमध्ये देण्यात आलेलं आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही त्यामुळे ते नाराज आहे. काँग्रेस त्यांच्याशी संपर्कात आहे. आज दिवसभर बैठक असल्यामुळे त्यांच्या सोबत चर्चा होऊ शकली नाही. शरद पवार यांनी देखील त्यांची नाराजी दूर करण्याचे आश्वासन दिलं आहे.

विद्यमान आमदार आणि ज्या मतदारसंघातून एक नाव आलं त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र दोन किंवा तीन नावं ज्या मतदारसंघातून आले त्यासंदर्भात येत्या दहाला सप्टेंबरला निर्णय होणार आहे.

सुप्रिया सुळेंचं हर्षवर्धन पाटलांना थेट आवाहन

Loading...

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी इंदापूरमध्ये मेळावा घेऊन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादी धोकेबाज, दगाबाज, विश्वासघातकी आहे असा घणाघाती आरोप करत पवार कुटुंबीयांवर त्यांनी सगळा राग काढला होता. हा राग काढत असतानाच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचेही संकेत दिले होते. हर्षवर्धन पाटील यांचे हे आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलेच लागले आहेत. आज पुण्यात त्यांनी पाटील यांना या दगाबाजीचे पुरावे सादर करण्याचं थेट आव्हानच दिलं.

नांदेडमध्ये 9 जगांसाठी 100 अर्ज; पण नोकरीसाठी नाही तर...

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात कौटुंबीक संबंध आहेत. त्यांचे कालचं भाषण ऐकल्यानंतर दुःख झालं. त्यानंतर मी त्यांना अनेकवेळा फोन केला पण त्यांचा फोन लागला नाही. दगाबाजीच्या आरोपाचे त्यांनी पुरावे दिले पाहिजेत. जे पक्ष सोडून जाताहेत ते मुलांच्या भवितव्यासाठी विचारांची फरफट करताहेत. मला कौतुक वाटतय की पवारांना फक्त मुलगीच आहे. आता फक्त मुलांचा प्रवेश होतो वडिलांना नकार मिळतो असंही त्या म्हणाल्यात.

कोल्हापूर दक्षिणच्या 'आखाड्या'त रंगणार पाटील विरुद्ध महाडीक असा सामना!

छगन भुजबळ यांच्या शिवसेने प्रवेशाच्या चर्चेवरही त्यांनी मत व्यक्त केलं.  भुजबळांवर माझा विश्वास, कुणी काहीही म्हणेल, ते काही म्हणत नाहीत तोवर मी कशावरही विश्वास ठेवणार नाही. पवारांवर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रात कुणीही मोठ होऊ शकत नाही हा 50 वर्षांचा इतिहास आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...