सांगोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार, 'या' युवानेत्यानं केला भाजप प्रवेश

सांगोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार, 'या' युवानेत्यानं केला भाजप प्रवेश

सांगोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. कारण सांगोला तालुक्यातील युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

  • Share this:

सोलापूर, 19 जुलै : सांगोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. कारण सांगोला तालुक्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 'माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला तालुक्यातील लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असताना भविष्यात प्रादेशिक पक्षात न राहता तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत', अशी प्रतिक्रिया चेतनसिंह केदार यांनी यावेळी दिली.

(पाहा : SPECIAL REPORT : कोळी महिलांवर बीएमसीकडून अन्याय? राज ठाकरेंनी दिला पाठिंबा)

माजी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले चेतनसिंह केदार भाजपवासी झाल्यानं सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठं नुकसान झालं आहे.दरम्यान, केंदार यांचा भाजपप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच महागात पडणार असल्याचं दिसत आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना हा मोठा हादरा असल्याचे मानले जात आहे.

(पाहा : आदित्य ठाकरेंना का हवाय 'जन आशीर्वाद', काय आहे 'मातोश्री'च्या मनात?)

चंद्रकांत पाटील यांचा दावा

'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामा देतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील,' असा दावा महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यामुळे आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे. ते राजीनामा देवून हातपाय गाळत आहेत. त्यामुळे त्यांचे आमदारही आता राजीनामा देतील. निवडणुकीला सहा किंवा त्यापेक्षा जास्त महिने बाकी असताना राजीनामा दिला तर पोटनिवडणूक होते. पण आता तर निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या आठवड्याभरात अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील,' असा दावा चंद्रकात पाटील यांनी केला आहे.

(पाहा : VIDEO : खेकड्याने डोंगरीतली इमारत पाडली का? अजित पवारांची टोलेबाजी)

SPECIAL REPORT : काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोण-कोणते आमदार लागले भाजपच्या गळाला?

First published: July 19, 2019, 7:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading