लढत विधानसभेची : मध्य सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ

लढत विधानसभेची : मध्य सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक सोपी राहिलेली नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मध्य सोलापूर मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळालं. त्यामुळे काँग्रेसची ताकद इथे कमी झाली आहे.

  • Share this:

सोलापूर, 18 सप्टेंबर : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक सोपी राहिलेली नाही. याआधी 2009 च्या निवडणुकीत त्यांच्या सामाजिक कार्यामुळे प्रणिती शिंदे विजयी झाल्या. 2014 च्या मोदी लाटेतही प्रणिती शिंदे विजयी झाल्या.

2014 निवडणुकीत इथे एमआयएमचा प्रभाव जाणवला होता. एमआयएमचे तौफीक शेख यांनी प्रणिती शिंदे यांना कडवी झुंज दिली. यंदाच्या विधानसभेत एमआयएमला प्रकाश आंबेडकरांची साथ मिळाली होती. पण एमआयएमचे तौफिक शेख यांना खुनाच्या खटल्यात तुरुंगात जावं लागलं आहे. त्यामुळे आता वंचिततर्फे उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे.. वंचितचा उमेदवार जितका प्रभावी असेल तितकंच प्रणिती शिंदे यांच्यासमोरचं आव्हान वाढणार आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते असलेल्या सुशीलकुमार शिंदेंचा 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव झाला. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचं आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणावं तसं पाठबळ प्रणिती शिंदे यांच्यासोबत नाही.

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात सुमारे 1 लाख मुस्लीम मतदार आहेत. त्याचबरोबर दलित समाजही आहे. कामगार आणि झोपडपट्टीवासियांसाठी हा मतदारसंघ ओळखला जातो. त्यामुळे या मतदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य

प्रणिती शिंदे यांना काँग्रेसमधूनही पुरेशी साथ मिळताना दिसत नाही. उलट प्रणिती शिंदे यांनी मोहोळच्या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि मुस्लीम किंवा मोची समाजातल्या नेतृत्वाला इथे उमेदवारी मिळावी, असं काही काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मध्य सोलापूर मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळालं. त्यामुळेही काँग्रेसची ताकद इथे कमी झाली आहे. इथे जर भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर ही निवडणूक प्रणिती शिंदेंसाठी आणखी कसोटीची ठरू शकते.

लढत विधानसभेची : नागपूर पूर्व मध्ये यंदा कोण बाजी मारणार?

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं

प्रणिती शिंदे, काँग्रेस - 46 हजार 907

तौफिक शेख, एमआयएम – 37 हजार 138

महेश कोठे, शिवसेना – 33 हजार 334

मोहिनी पत्की, भाजप – 23 हजार 319

2019 च्या लोकसभेत मध्य सोलापूर मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मतं

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप - 80 हजार 823

सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस - 49 हजार 994

प्रकाश आंबेडकर, वंचित - 27 हजार 468

========================================================================================

VIDEO 'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान

First published: September 18, 2019, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading