अजित पवारांवर शिवसेना नेत्याकडून एकेरी शब्दात हल्ला, राजकारण तापणार

अजित पवारांवर शिवसेना नेत्याकडून एकेरी शब्दात हल्ला, राजकारण तापणार

अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवावरून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली होती.

  • Share this:

मुंबई, 21 जुलै : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, त्याने माझ्यावर टीका करणं योग्य नाही,' असा हल्लाबोल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

'अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही. तेव्हा चेहरा कुणाचा काळवंडलाय हे अख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मी राजकारणात स्वतःच्या हिंमतीवर आलोय, माझे चुलते मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री नव्हते. बांदल, मोहिते हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मारामाऱ्या, दंगली तुम्ही घडवायच्या, जमीन व्यवहारातून लोकांची फसवणूक तुम्ही करायची, खंडणी तुम्ही गोळा करायची आणि पोलिसांनी कारवाई केल्यावर नाव आढळराव पाटलांचं घ्यायचं, हे कुठलं राजकारण?' असा सवाल करत आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं.

अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवावरून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली होती. त्यावरून आता आढळराव पाटलांनी पलटवार केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे.

आढळरावांनी घेतला राष्ट्रवादीच्या 'त्या' दोन्ही नेत्यांचा समाचार..

 पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन नेते यापैकी एक खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण दंगलीचे आरोप आहेत तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, दोघेही शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्या यांच्या सांगण्यावरून पोलीस हे करत आहेत, असा आरोप करत आहेत. याबाबत रविवारी शिवाजी आढळराव यांनी या दोन्ही नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीचे या दोन्ही नेत्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याला लोकसभेतील आढळरावांचा पराभव झाल्याने हे गुन्हे दाखल झाल्याची आगपाखड दोघांकडून केली जात असल्याने ते सांगत आहेत. यावर आढळराव यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला.

म्हणाले की, या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. मंगलदास बांदल हा जमिनीच्या व्यवहारात लोकांना ठगतो, लोकांना फसवणे, खंडणी मागणे, कंपनी मालकांना त्रास देणे, डान्स बार चालवणे किंवा लोकांना धमकावणे अशा प्रकारची त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. 300 ते 400 कुटुंबाची जमीन व्यवहारात फसवणूक करण्यात आली आहे. बांदलची गुन्हेगार पार्श्वभूमी असताना तो माझे नाव का घेतो? असा सवालही आढळराव यांनी यावेळी उपस्थित केला.

दिलीप मोहिते जर राजकारणात आला नसता तर एक अट्टल गुन्हेगार दंगलखोर अशा स्वरूपाचा माणूस म्हणून उदयास आला असता, असे सांगत मोहितेची चाकण दंगल प्रकरणात विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. चाकण शहराचे वातावरण बिघडवणे आणि मराठी मोर्चाला बदनाम करायचे काम त्यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी चालू आहे, असे असताना 15 वर्षांत अशा स्वरूपाचे कोणतेही आरोप मी त्यांच्यावर केले नाहीत. पोलिसांनी पकडले की, आढळरावने हे केले, असे ते म्हणतात, हे कुठं तरी थांबवा, असे आवाहन आढळराव यांनी यावेळी केले आहे.

VIDEO: 'गर्दी झाली म्हणून पाहायला गेलो अन् समोर भाऊच रक्ताच्या थारोळ्यात होता'

Published by: Akshay Shitole
First published: July 21, 2019, 5:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading