भाजप पाठोपाठ शिवसेना ही मैदानात; 70 जणांची पहिली यादी जाहीर!

भाजप पाठोपाठ शिवसेना ही मैदानात; 70 जणांची पहिली यादी जाहीर!

भाजप पाठोपाठ शिवसेनेने देखील विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर: भाजप पाठोपाठ शिवसेनेने देखील विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने 125 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आता शिवसेनेने 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आदित्य ठाकरे, प्रदीप शर्मा याच्या नावाचा समावेश आहे. अपेक्षे प्रमाणे आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, मुंबादेवीहून पांडुरंग , जालन्यातून अर्जुन खोतकर, नालासोपारा येथून प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अशी आहे शिवसेनेची पहिली यादी-

नांदेड दक्षिण - राजश्री पाटील

मुरुड - महेंद्र शेठ दळवी

हदगाव - नागेश पाटील आष्टीकर

मुंबादेवी - पांडुरंग सकपाळ

भायखळा - यामिनी जाधव

गोवंडी - विठ्ठल लोकरे

एरोंडेल/ पारोळा - चिमणराव पाटील

वडनेरा - प्रीती संजय

श्रीवर्धन - विनोद घोसाळकर

कोपर पाचकपडी - एकनाथ शिंदे

वैजापूर - रमेश बोरनावे

शिरोळ - उल्हास पाटील

गंगाखेड - विशाल कदम

दापोली - योगेश कदम

गुहागर - भास्कर जाधव

अंधेरी पूर्व - रमेश लटके

कुडाळ - वैभव नाईक

ओवला माजीवाडे - प्रताप सरनाईक

बीड - जयदत्त क्षीरसागर

पार ठाणे - सांदीपान भुमरे

शहापूर - पांडुरंग बरोला

नगर शहर - अनिलभैय्या राठोड

सिल्लोड - अब्दुल सत्तार

औरंगाबाद (दक्षिण) - संजय शिरसाट

अक्कलकुवा - आमशा पडवी

इगतपुरी - निर्मला गावित

वसई - विजय पाटील

नालासोपारा - प्रदीप शर्मा

सांगोला - शाबजी बापू पाटील

कर्जत - महेंद्र थोरवे

धन सावंगी - डॉ.हिकमत दादा उधन

खानापूर - अनिल बाबर

राजापूर - राजन साळवी

करवीर - चंद्रदीप नरके

बाळापूर - नितीन देशमुख

देगलूर - सुभाष सबणे

उमरगा लोहारा - ज्ञानराज चौगुले

डिग्रस - संजय राठोड

परभणी - डॉ.राहुल पाटील

मेहकर - डॉ.संजय रायमुलकर

जालना - अर्जुन खोतकर

कळमनुरी - संतोष बांगर

कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर

औरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाट

चंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकर

वरळी - आदित्य ठाकरे

शिवडी - अजय चौधरी

इचलकरंजी - सुजित मिणचेकर

राधानगरी - प्रकाश आबिटकर

पुरंदर - विजय शिवतारे

दिंडोशी - सुनील प्रभु

जोगेश्वरी पूर्व - रवी वायकर

मागठाणे - प्रकाश सुर्वे

गोवंडी - विठ्ठल लोकरे

विक्रोळी - सुनील राऊत

अनुशक्ती नगर - तुकाराम काटे

चेंबूर - प्रकाश फतारपेकर

कुर्ला - मंगेश कुडाळकर

कलिना - संजय पोतनीस

माहीम - सदा सारवणकर

जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील

पाचोरा - किशोर पाटील

मालेगाव - दादाजी भुसे

सिन्नर - राजाभाऊ वझे

निफाड - अनिल कदम

देवळाली - योगेश घोलप

खेड - आळंदी - सुरेश गोरे

पिंपरी - गौतम चाबुकस्वार

येवला - संभाजी पवार

नांदगाव - सुहास खांडे

भाजपच्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 12 विद्यामान आमदारांचा पत्ता कट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता भाजप कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे.

भाजपची पहिली यादी: 12 जणांचा पत्ता कट, हे दिग्गज गॅसवर!

First Published: Oct 1, 2019 02:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading