युतीच्या इतिहासात शिवसेना पहिल्यांदाच होणार लहान भाऊ, 'या' फॉर्म्युल्यावर लवकरच शिक्कामोर्तब?

युतीच्या इतिहासात शिवसेना पहिल्यांदाच होणार लहान भाऊ, 'या' फॉर्म्युल्यावर लवकरच शिक्कामोर्तब?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेना भाजप एकत्रितरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

  • Share this:

मुंबई, 9 सप्टेंबर : राज्यात शिवसेना भाजप या दोन वर्षांची गेल्या अनेक वर्षांपासून युती आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या युतीला धक्का बसला होता. मात्र निवडणूक निकालानंतरच्या स्थितीनं या पक्षांना पुन्हा एकत्र आणलं. त्यानंतर यंदाची लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेनेनं एकत्र लढवली. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. पण यावेळी युती होताना शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका स्वीकारावी लागणार असल्याची चिन्ह आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला देशासह राज्यात मोठं यश मिळालं. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात युती करताना तडजोड न करण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे शिवसेनेला लहान भावाची भूमिका स्वीकारावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये भाजपला 154 ते 159 जागा मिळतील तर दोन्ही पक्ष महायुतीतील मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा सोडतील, असा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला 120 जागाच मिळणार आहेत. मात्र हा फॉर्म्युला शिवसेना नेतृत्वाकडून मान्य केला जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. तसंच मतदारसंघातील समीकरणं लक्षात घेत युती आणि आघाडीचा फॉर्म्युला तयार करण्यावरही भर देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव यांच्या नेतृत्वात भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 2 वाजता ही बैठक सुरू होईल. यावेळी निवडणूक निरीक्षकांच्या मतदारसंघ निहाय अहवालावर चर्चा होणार आहे. शिवसेना - भाजप युतीच्या जगावाटप वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याने भाजप लढणार असलेल्या मतदारसंघांचा या अहवालाच्या आधारावर आढावा घेतला जाणार आहे.

एकहाताने टाळी वाजत नाही? मग पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 10:58 AM IST

ताज्या बातम्या