हिंगोली ते कणकवली...बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली

हिंगोली ते कणकवली...बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली

कणकवलीमध्ये भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे.

कणकवलीमध्ये भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. कोकणातल्या कणकवलीत पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगाणार आहे. अखेरच्या दिवशी भाजपने नितेश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देत AB फॉर्म दिला. राज्यात युती असली तरी कणकवलीत मात्र 'युती' तुटल्यातच जमा आहे. कारण भाजपचे उमेदवार असलेले नितेश राणे यांना कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी राणेंना पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेने सतीश सावंत यांना पाठिंबा देत AB फॉर्म दिलाय. AB फॉर्म दिल्यामुळे ते सेनेचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. सतीश सावंत हे काही दिवसांपूर्वीच राणेंच्या स्वाभीमान पक्षातून बाहेर पडले होते. त्यामुळे ही लढत चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.

हिंगोलीत शिवसेनेच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघात शिवसेनेचे संतोष बांगर यांना उमेदवारी जाहीर होताच नाराजीचा सूर उमटू लागला आहे. भाजपने या मतदार संघात मोठी शक्ती वाढवली होती. यामुळे कळमनुरी भाजपला सोडावे अशी मागणी केली जात होती . मात्र ही जागा सेनेला दिल्याने नाराज भाजप नेते माजी आमदार गजानन घुगे आणि माजी खासदार शिवाजी माने यांनी बंडखोरी करत एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे भाजपशी बंडखोरी जरी केली तरीही या शक्तिप्रदर्शनात बंडखोरांनी चक्क भाजपचे झेंडे फडकवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गुहागरमध्ये भास्कर जाधव अडचणीत

गुहागर विधानसभा मतदार संघातून भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे यांनी बंडखोरी केली आहे. रामदास राणे यांनी गुहागरमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे नुकतंच राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधव यांची डोकेदुखी वाढली आहे.

घाटकोपरमध्ये शिवसैनिकांचा मनसेला पाठिंबा

घाटकोपरमधून भाजपने पुन्हा एकदा राम कदम यांना तिकीट दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. 'उद्धवजी आम्हाला माफ करा, या मतदारसंघात आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला मदत करू,' अशा आशयाचे पोस्टर्स शिवसैनिकांकडून लावण्यात आले होते.

एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादीतून झालेल्या मोठ्या इनकमिंगनंतर भाजप आणि शिवसेनेत उत्साहाचं वातावरण होतं. मात्र आता अनेक मतदारसंघात बंडखोरांनी डोकं वर काढल्याने युतीच्या अडचणी वाढल्या आहेत.

VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

Published by: Akshay Shitole
First published: October 4, 2019, 4:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading