युतीचं घोडं पुन्हा अडलं, 'या' 12 जागांवरून भाजप-शिवसेनेत संघर्ष

भाजपकडून शिवसेनेला 115 जागांचा प्रस्ताव, मात्र शिवसेना 125 च्या मागणीवर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 08:48 AM IST

युतीचं घोडं पुन्हा अडलं, 'या' 12 जागांवरून भाजप-शिवसेनेत संघर्ष

मुंबई, 24 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असली तरीही युतीचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. भाजपकडून शिवसेनेला 115 जागांचा प्रस्ताव, मात्र शिवसेना 125 च्या मागणीवर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे 10 ते 12 जागांवर युतीचं घोडं अजूनही अडल्याचं दिसत आहे.

संयुक्त पत्रकार परिषदेत आज शिवसेना भाजप युतीची घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र काही जागांवर दोन्ही पक्षांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आज संयुक्त पत्रकार परिषद होत युतीची घोषणा होण्याची शक्यता मावळली आहे.

युतीत संघर्ष निर्माण करणाऱ्या 12 जागा कोणत्या?

मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या 25 वर्षांपासून अभेद्य असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर राज्यात भाजपने आपली वाढलेली ताकद दाखवून देत 122 जागांपर्यंत मजल मारली. यंदा मात्र दोन्ही पक्षांनी एकत्रिपणे विधानसभा निवडणुकांचा सामना करत आहेत. मात्र काही जागांवरून युतीचं घोड अडलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल तसंच विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया आणि मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर आणि ठाण्यातील उल्हासनगर या जागांचा समावेश आहे.

युतीच्या जागावटापात 50-50च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र शिवसेना कमी जागा घ्यायला राजी झाली नाही. बदलती राजकीय परिस्थिती इतर पक्षांमधल्या नेत्यांचं भाजपमध्ये येणं. लोकसभेनंतर वाढलेली ताकद यामुळे जास्त जागा मिळाव्यात अशी भाजपची मागणी आहे. तर 50 टक्क्यांपेक्षा कमी जागा घ्यायला शिवसेना तयार नाही.

Loading...

लोकसभा निवडणुकीत भाजपने तडजोड करत एक जागा शिवसेनेला दिली होती. त्यामुळे तोच लवचिकपणा विधानसभेत शिवसेनेने दाखवावा अशी अपेक्षाही भाजपची आहे. भाजपने जो अंतर्गत सर्व्हे केला त्यात स्वबळावर सत्ता मिळू शकते असं दिसून आल्याने भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे.

VIDEO : हेल्मेट घालून केली चोरी; विदेशी दारूसह 50000 लुटतानाची दृश्य CCTV मध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 08:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...