भाजप-शिवसेनेच्या 50 जागा धोक्यात, विधानसभेचं गणित बदलणार?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 01:35 PM IST

भाजप-शिवसेनेच्या 50 जागा धोक्यात, विधानसभेचं गणित बदलणार?

मुंबई, 10 ऑक्टोबर : भाजप आणि शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणूक सोपी असल्याचं मानलं जात असतानाच युतीला धक्का बसला आहे. कारण जवळपास 50 मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी वाढवली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातीलही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलं आहे. त्यामुळे बंडखोर नेते भाजप-शिवसेनेचं गणित बिघडवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मित्रपक्षांची नाराजी पडणार भारी?

जागावाटपातील गोंधळावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. 'भाजपने आम्हाला धोका. आमच्या उमेदवारांना त्यांनी स्वत:चा एबी फॉर्म दिला,' असं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...

'महायुतीमध्ये आम्हाला 2 जागा आमच्या पक्षाच्या चिन्हावर देण्यात आल्या होत्या. मात्र भाजपने आम्हाला त्यांचाच एबी फॉर्म दिला. आमच्या उमेदवारांचा दोष आहे की त्यांनी तो फॉर्म स्वीकारला. दौंडला राहुल कुल आणि जिंतूरला मेघन बोर्डीकर हे आता आमचे उमेदवार नाहीत,' असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही निवडणुकीत आम्ही महायुतीसोबतच असू, अशी भूमिकाही घेतली आहे. मात्र भाजपने आम्हाला धोका दिला, या जानकर यांच्या आरोपामुळे रासपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे हे नाराज कार्यकर्ते भाजपला सहकार्य करणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...