'...तरच मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार', आदित्य ठाकरेंचा खुलासा

'...तरच मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार', आदित्य ठाकरेंचा खुलासा

आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

  • Share this:

उदय जाधव, धुळे, 19 जुलै : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद यात्रा' दुसऱ्या दिवशी धुळे इथं पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

'मुख्यमंत्री कोण असेल हे उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांचे जे ठरलंय त्याप्रमाणे होईल. माझ्यासाठी ही फक्त तीर्थ यात्रा आहे. होय जर लोकांचे आशीर्वाद असतील तर मी निवडणूक लढवेन,' अशा स्पष्ट शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकते दिले आहेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

'मी शिवसेनेसोबतच भाजपच्याही मतदारसंघात त्यांचा प्रचार करेन. कारण आमची युती अभेद्य आहे. इथं मी लोकांची मनं जिंकण्यासाठी आलो आहे. राजकीय नेते निवडणुकीनंतर लोकांना विसरतात मात्र आम्ही लोकांना विसरलो नाही,' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

'...तर आदित्य ठरतील पहिलेच निवडणूक लढवणारे पहिलेच ठाकरे'

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे अनेक वर्ष महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले. मात्र ते कधीही प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले नाहीत. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हेही निवडणूक लढवण्यापासून दूरच राहिले. पण आता आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीला उभे राहिल्यास प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे ते पहिलेच ठाकरे होतील.

आदित्य यांच्याबद्दल काय म्हणाले संजय राऊत?

'शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाची ही सुरुवात आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जावं. जिकडे आमदार आहेत तिकडे आशीर्वाद आहे आणि जिकडे नाहीत तिकडे आमदार करायला ही यात्रा आहे,' असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या जन-आशीर्वाद यात्रेबद्दल भाष्य केलं होतं.

VIDEO : संसदेत विषय शेतकरी कर्जमाफीचा पण प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना!

First published: July 19, 2019, 4:04 PM IST

ताज्या बातम्या