दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री पडले बळी.. शिवसेना नेत्याची खोचक टीका

'नाणार' होऊ शकतो, असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी खोचक टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 04:39 PM IST

दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री पडले बळी.. शिवसेना नेत्याची खोचक टीका

शिवाजी गोरे,(प्रतिनिधी)

रत्नागिरी,22 सप्टेंबर:'नाणार' होऊ शकतो, असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी खोचक टीका केली आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी शेतकरी मच्छिमार संघटनेची तारळ येथे सभा झाली. खासदार विनायक राऊत ,आमदार राजन साळवी हे यावेळी उपस्थित होते.

दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री बळी पडले..

'आमचं नातं लाल मातीशी आहे. मग आम्हाला रिफायनरी नको... दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री बळी पडले. शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सेनाविरोधी भूमिका घेतली आहे.

'एकच जिद्द रिफायनरी रद्द'ची खासदार विनायक राऊत याची व्यासपीठावरुन घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्याना येथील जनतेचे मत जाणून घ्यायचे असेल तर समोरासमोर चर्चेला या, असे आव्हान देखील खासदार राऊत यांनी केले आहे. जे शिवसैनिक प्रकल्प समर्थनाची बाजू घेत आहेत, त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करणार असल्याचा इशारा खासदार राऊत यांनी दिला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेचा युतीवर काय परिणाम होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading...

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार रिफायनरी प्रकल्पाचे थांबलेले कवीत्व पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरु झाले आहे. दुसरीकडे ही राजकीय खेळी असल्याचेही जनतेतून बोलले जात आहे.

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...