लढत विधानसभेची : मंत्री जयकुमार रावल हॅटट्रिक करणार का?

लढत विधानसभेची : मंत्री जयकुमार रावल हॅटट्रिक करणार का?

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा हा मतदारसंघ. या मतदारसंघातून याआधी डॉ. हेमंत देशमुख यांना आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं होतं.त्यामुळे हा मतदारसंघ मंत्रिपदं मिळवून देणारा ठरला.

  • Share this:

धुळे, 17 सप्टेंबर : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा हा मतदारसंघ. या मतदारसंघातून याआधी डॉ. हेमंत देशमुख यांना आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं होतं.त्यामुळे हा मतदारसंघ मंत्रिपदं मिळवून देणारा ठरला.

शिंदखेडा हा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात येतो. सिंचन, रोजगार हे प्रश्न या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याचबरोबर औष्णिक वीज प्रकल्प, सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प यामुळे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्याही समस्या आहेत.

2009 पासून ते आजपर्यंत जयकुमार रावल हेच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे आता ही विजयी परंपरा ते याहीवेळी कायम राखणार का, याची चर्चा मतदारांमध्ये आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार रावल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप बेंडसेंचा पराभव केला होता. त्यावेळी विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या लढल्याने आघाडी आणि युती, दोघांचही नुकसान झालं होतं.

लढत विधानसभेची : अक्कलकुवामध्ये काँग्रेसचे के. सी. पाडवी पुन्हा बाजी मारणार?

आता यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, जुही देशमुख, ज्ञानेश्वर भामरे, राष्ट्रवादीतर्फे संदीप बेडसे, शिवसेनेतर्फे हेमंत साळुंखे यांची नावं चर्चेत आहेत. भाजपतर्फे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे.

जयकुमार रावल यांनी आतापर्यंत केलेली कामं आणि तरुण वर्गाचा प्रतिसाद यावर त्यांचं इथलं भवितव्य अवलंबून आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचा वरचष्मा होता. ही गोष्ट जयकुमार रावल यांच्यासाठी अनुकूल ठरू शकते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीतलं मतदान

1. जयकुमार रावल (भाजप) - 92 हजार 764

2. संदीप बेडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 50 हजार 636

3. श्यामकांत सनेर (काँग्रेस) - 48 हजार 25

4. राजेंद्रसिंग गिरासे (शिवसेना) - 2 हजार 263

2019 च्या लोकसभा निवडणुकीतलं मतदान

1. डॉ . सुभाष भामरे (भाजप) - 1 लाख 13 हजार 667

2. कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस) -60 हजार 78

============================================================================================

VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 07:51 PM IST

ताज्या बातम्या