Elec-widget

निवडणुकीत राजू शेट्टींना दुसरा मोठा धक्का, कोल्हापुरात 'स्वाभिमानी'ला खिंडार

निवडणुकीत राजू शेट्टींना दुसरा मोठा धक्का, कोल्हापुरात 'स्वाभिमानी'ला खिंडार

राजू शेट्टी यांना कोल्हापूर जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 11 ऑक्टोबर : कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसला आहे. स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काटे यांच्या भाजप प्रवेशामुळे राजू शेट्टी यांना कोल्हापूर जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून भगवान काटे हे या संघटनेत होते. ऊस दराबाबत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये काटे यांनी सहभाग घेतला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

काही दिवसांपूर्वी स्वाभिमानीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही पक्ष सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षानेही साथ सोडल्याने राजू शेट्टींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

तुपकर यांनीही हाती घेतलं आहे कमळ

सदाभाऊ खोत यांनी भाजपशी सलगी करत नव्या संघटनेची स्थापना केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आक्रमक रविकांत तुपकर यांची स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यपदी नेमणूक केली. लोकसभा निवडणुकीत रविकात तुपकर यांनी अत्यंत आक्रमकपणे भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना आघाडीच्या जागावाटपामुळे इच्छा असूनही लढण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना विधानसभेचं आश्वासन दिल्याचं बोललं गेलं. मात्र आताही त्यांना कोणताही मतदारसंघ सोडला जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर अखेर विधानसभा निवडणुकीत रविकांत तुपकर हे भाजपमध्ये दाखल झाले.

Loading...

दरम्यान, रविकांत तुपकर यांनी पक्ष सोडल्यास राजू शेट्टी यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. आधी सदाभाऊ खोत यांनी संघटनेपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आता रविकांत तुपकर आणि भगवान काटे यांनी पक्ष सोडला. त्यामुळे राजू शेट्टी या सर्व अडचणीतून कसा मार्ग काढतात, हे पाहावं लागेल.

जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेत? राज ठाकरेंचं गोरेगावमधील UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...