इंदापुरात राष्ट्रवादीला खिंडार, हर्षवर्धन पाटलांची खेळी यशस्वी

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या अडचणींत वाढ झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 03:01 PM IST

इंदापुरात राष्ट्रवादीला खिंडार, हर्षवर्धन पाटलांची खेळी यशस्वी

इंदापूर, 7 ऑक्टोबर : इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या अडचणींत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार आप्पासाहेब जगदाळे यांनी भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला आहे. आप्पासाहेब जगदाळे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे सभापती आहेत.

इंदापूर तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांसह आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंदापूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तामामा भरणे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या या खेळीला दत्तामामा भरणे कसं उत्तर देणार, त्यावर मतदारसंघातील गणितं ठरणार आहेत.

हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश

काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये घेतलेल्या मेळाव्यात पाटील यांनी राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप केला. काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलं असाही आरोप त्यांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राज्यातील काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला हा मोठा धक्का होता. कारण पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते आहेत. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे ते 4 वेळा आमदार होते. सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी केला. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात त्यांनी 5 वर्षे मंत्री म्हणून काम केलं आङे. एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं.

Loading...

इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील नाराज होते. राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला सोडायला तयार नव्हती. त्यामुळे 2014 सारखच कोंडीत पकडलं जाईल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 03:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...