भोकरदनमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का, तालुकाध्यक्षाने सोडली साथ

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्वाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं नंदू पाटील गिर्हे यांनी सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 11:14 AM IST

भोकरदनमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का, तालुकाध्यक्षाने सोडली साथ

विजय कमळे पाटील, 8 ऑक्टोबर : भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रकांत दानवे यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नंदू पाटील गिर्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्वाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं नंदू पाटील गिर्हे यांनी सांगितलं. तालुकाध्यक्षाने पक्ष सोडल्याने निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत दानवे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नंदू पाटील गिर्हे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

काय आहे भोकरदन मतदारसंघाची स्थिती?

103-भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पुंडलिकराव दानवे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

निवृत्ती विश्वनाथ बनसोडे- बहुजन समाज पार्टी

Loading...

संतोष रावसाहेब दानवे- भारतीय जनता पार्टी

बोऱ्हाडे दिपक भिमराव- वंचित बहुजन आघाडी

राजु अशोक गवळी- भारतीय ट्रायबल पार्टी

मुजाहीद अब्दुल बारी सिद्दीकी-अपक्ष

विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट, 'या' जिल्ह्यातून लढणार सर्वाधिक उमेदवार

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. छाननीअंती 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.

सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदूर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. नांदेड दक्षिण हा सर्वाधिक उमेदवार असणारा मतदारसंघ ठरला आहे तर सर्वात कमी उमेदवार चिपळूण मतदारसंघात आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयु) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे.

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...