काँग्रेस-राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असणाऱ्या आमदारांचीच वाढली डोकेदुखी

काँग्रेस-राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असणाऱ्या आमदारांचीच वाढली डोकेदुखी

निवडणुकांची घोषणा झाली असल्याने या आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. मात्र पक्षांतराचा तयारीत असलेले आघाडीत काही आमदार मात्र अजूनही वेटिंगवरच आहेत. त्यातच आता निवडणुकांचीही घोषणा झाली असल्याने या आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.

सोलापूर जिल्हा हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जात होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत युतीने या गडाला सुरुंग लावला. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या करमाळ्यातील रश्मी बागल यांनीही हाती शिवबंधन बांधलं.

दुसरीकडे, माढ्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि सिद्धराम म्हेत्रे हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र वाटाघाटी पूर्ण न झाल्याने या आमदारांचा भाजप प्रवेश अद्याप होऊ शकलेला नाही. अशातच आता निवडणुकाही जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे नक्की कुणाकडून लढायचं याबाबत या आमदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा आहे.

पक्ष सोडलेल्यांची राष्ट्रवादी करणार कोंडी

1. रश्मी बागल

करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मागील निवडणुकीत शिवसेनेकडूनच रश्मी बागल यांचा निसटता पराभव झाला होता. पण यावेळी रश्मी बागल यांनी थेट शिवसेनेतच प्रवेश केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून लढलेल्या संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी करमाळ्यातून उतरवण्याची शक्यता आहे.

2. दिलीप सोपल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली होती. त्याचवेळी सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला. या मेळाव्यानंतर दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल गेले. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बाळराजे पाटील यांना संधी दिली जाऊ शकते किंवा भाजपच्या राजेंद्र राऊत यांना राष्ट्रवादी आपल्याकडे खेचू शकते.

3. बबनदादा शिंदे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतराचे वारे अतिवेगाने वाहत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या गोटात दाखल होत आहेत. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बबनदादा शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवाजी कांबळे यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात भाजपच्या खेळीला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातील तरुणांना अधिकाधिक संधी देण्याच्या विचारात आहे. मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.

VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 11:54 AM IST

ताज्या बातम्या