सोलापूरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, निवडणुकीत अडचण वाढणार

सोलापूरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, निवडणुकीत अडचण वाढणार

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने इंदमती अलगोंडा या पक्षात नाराज होत्या.

  • Share this:

सोलापूर, 11 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस बाकी असतानाच सोलापुरात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सोलापूरमधील काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंडा यांनी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने इंदमती अलगोंडा या पक्षात नाराज होत्या. पक्षात निष्ठावंताची कदर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पक्षनेतृत्त्वाला कदर नसल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अलगोंडा यांच्या राजीनाम्यावर ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणींत भर पडली आहे.

पंढरपूरमध्ये आघाडीत गोंधळ

पंढरपूरच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून कॉंग्रेस नेत्यांनीही पंढरपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येथील जागेरून निवडणूक प्रचारापूर्वीच दोन्ही कॉंग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. महायुतीने राजकारणातील मुरब्बी सुधाकर परिचारकांना उमेदवारी देत विरोधी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. परिचारकांच्या विरोधात कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार भारत भालकेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीही बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.

जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेत? राज ठाकरेंचं गोरेगावमधील UNCUT भाषण

First published: October 11, 2019, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading