निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला झटका, मुंबईचा माजी अध्यक्ष भाजपच्या प्रचारासाठी मैदानात

निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला झटका, मुंबईचा माजी अध्यक्ष भाजपच्या प्रचारासाठी मैदानात

विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या अडचणीत थांबत नसल्याचं चित्र आहे.

  • Share this:

मुंबई, 6 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या अडचणीत थांबत नसल्याचं चित्र आहे. कारण संजय निरूपम यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचारापासून दूर राहण्याची भूमिका घेतल्यानंतर नुकताच पक्ष सोडलेल्या कृपाशंकर सिॅग यांनी थेट भाजपा उमेदवार प्रचारात सहभागी झाले आहेत.

मुंबईमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत कलह वाढताना दिसत आहे. दुसरीकडे कृपाशंकर सिंग यांनी स्वत: निवडणूक लढवत नसताना भाजपमध्ये प्रवेश न करता प्रचारात मात्र उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मिरा रोड-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रचार करण्याचा निर्णय कृपाशंकर सिंग यांनी घेतला आहे.

दसऱ्यानिमित्त रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. तिथं नरेंद्र मेहताही आले होते असं स्पष्टीकरण कृपाशंकर सिॅग यांनी दिलं आहे. मात्र सिंग यांचा भाजपा उमेदवारासोबतचा फोटो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

कृपाशंकर सिंग आणि काँग्रेस

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. कुठल्या पक्षात जायचं याचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सिंग हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या लोकसभेतल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही राजीनामा दिला होता. त्यानंतर हा काँग्रेसला दुसरा धक्का आहे. आघाडी सरकारमध्ये गृह राज्यमंत्री, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष तसंच राज्यातील काँग्रेसच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर सिंग यांनी कामं आहे.

संजय निरुपम यांच्या मुंबई अध्यक्षपदाचे नियुक्तीनंतर काँग्रेसमध्ये ते पक्षात अस्वस्थ होते. गेली दोन वर्ष गणपतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आवर्जून हजेरी लावत होते. याच माध्यमातूनं ते मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत होते. त्याचबरोबर सिंग हे भाजपातील दिल्लीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी उत्तर भारतीय म्हणून संपर्कात राहिले आहेत.

VIDEO : राज्याचा मुख्यमंत्री हा मराठा असावा, मराठा क्रांती मोर्च्याची मागणी

First published: October 6, 2019, 1:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading