भाजप मंत्र्याच्या बालेकिल्ल्यात 'हाय अलर्ट', पवार फॅक्टरनंतर 'या' कारणामुळेही वाढली डोकेदुखी

भाजप मंत्र्याच्या बालेकिल्ल्यात 'हाय अलर्ट', पवार फॅक्टरनंतर 'या' कारणामुळेही वाढली डोकेदुखी

अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 8 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीआधी भाजप नेते आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या एंट्रीने भाजपच्या बालेकिल्ल्यात आधीच हाय अलर्ट आहे. त्यातच आता पालकमंत्री राम शिंदे यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत बंडाच्या तयारीत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार राष्ट्रवादीच्या तिकीटावर कर्जतमधून लढणार आहेत. त्यासाठी रोहित पवार यांनी या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले नामदेव राऊत हे त्यांच्या कार्यकर्त्यांचा सोमवारी मेळावा घेणार आहेत. नामदेव राऊत हे बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे राम शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

नामदेव राऊत यांचा कर्जत तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी जर विधानसभा निवडणूक लढवली तर पालकमंत्री राम शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की समजलं जात आहे. त्यामुळे नामदेव राऊत यांच्या सोमवारी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रोहित पवारांचं आव्हान

विधानसभेच्या निवडणुकांना आता काही महिनेच राहिले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पवार कुटुंबातील तरुण पिढी आता राजकारणात सक्रीय होत आहे. पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर आता रोहित पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विधानसभेसाठी कर्जतमधून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी पक्षाकडे केली होती. रोहित यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे मुलाखतही दिली. त्यानंतर आता ते कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवतील हे निश्चित झालं आहे.

रोहित पवारांनी कर्जत भागात गेली काही वर्ष सतत दौरे करत कार्यकर्त्यांची फळीही तयार केली आहे. याआधी त्यांनी पुण्याच्या हडपसरमधूनही चाचपणी केली होती. मात्र अखेर त्यांनी आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कर्जत मतदारसंघावर शिक्कामोर्तब केलं.

VIDEO: पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांचा बाळासाहेब थोरातांनी घेतला समाचार

First published: September 8, 2019, 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading