नवनीत राणांनी दिला दगा, काँग्रेसच्या 'या' नेत्याकडून गंभीर आरोप

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी नवनीत राणा यांना निवडून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे मंगळवारी (27 ऑगस्ट) आभार मानले. पण यानंतर सभेत गोंधळ सुरू झाला.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 10:31 AM IST

नवनीत राणांनी दिला दगा, काँग्रेसच्या 'या' नेत्याकडून गंभीर आरोप

अमरावती, 28 ऑगस्ट : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी नवनीत राणा यांना निवडून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे मंगळवारी (27 ऑगस्ट) आभार मानले. पण यानंतर सभेत गोंधळ सुरू झाला. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्य काँग्रेसविरोधात काम करत असल्याचा थेट आरोप केला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काँग्रेस मेळाव्यात राणांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठेचे वचन घेतले होते. हे वचन राणांनी मोडल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत आहे.

(वाचा : शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका)

अमरावतीत सोमवारी (26 ऑगस्ट) काँग्रेसची 'महापर्दाफाश' सभा झाली. यादरम्यानच माणिकराव ठाकरेंनी नवनीत राणांना निवडून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानले. पण यावेळेस नवनीत राणा यांनी काँग्रेसला दगा दिल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. दरम्यान, आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपात जाणार नाही, असे वचन नवनीत राणा यांनी दिले होते. पण काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवनीत राणा यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर नवनीत राणा या देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

(वाचा : 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडेंच्या कारला पुण्यात अपघात)

त्यातच त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी बदल होतातच,असं विधान केलं होतं. त्यामुळे नवनीत राणा भाजपमध्ये जाणार असल्यांच्या चर्चांना जोर धरू लागला आहे. हिच नाराजी सोमवारी काँग्रेसच्या सभेत उघडपणे दिसून आली. दरम्यान आता यावर नवनीत राणा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...

(वाचा : काँग्रेसला गवसला हायटेक प्रचाराचा मंत्रा, असं पोहोचणार तरुणांपर्यंत!)

गणेश नाईकांनी शिवसेनेऐवजी भाजपला का दिली पसंती? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 09:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...