मतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 10:58 AM IST

मतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ, कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज?

मुंबई, 22 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता प्रत्येकाला निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानानंतर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र असं असलं तरीही काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजूनही चमत्काराची अपेक्षा आहे.

एक्झिट पोलमधून भाजप-शिवसेना पुन्हा सत्ता काबीज करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर सट्टाबाजारातही फारसं वेगळ चित्र नाही. भाजप आणि शिवसेनाच सत्तेचे प्रबळ दावेदार असल्याचं सट्टाबाजाराचं म्हणणं आहे. यावेळी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागला आहे.

सट्टाबाजारात काय आहे स्थिती?

यंदाच्या निवडणुकीत भाजप 120 जागांवर विजयी होईल, यासाठी सट्टाबाजारात एक रुपया 60 पैसे इतका दर सुरू आहे. तर शिवसेनेला 85 जागांवर यश मिळेल या अंदाजासाठी 3 रुपयांचा दर लावण्यात आला आहे. सट्टाबाजाराने काँग्रेसला 30 जागांवर विजय मिळेल, यासाठी 2.50 रुपये तर राष्ट्रवादीच्या 30 जागांसाठी 3.50 रुपयांचा दर सुरू आहे. याबाबत एका हिंदी वेबसाईटने वृत्त दिलं आहे.

काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

Loading...

News18 Lokmat आणि IPSOS च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. या पोलनुसार, पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

2019 मतदानोत्तर चाचणी

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर - 02

अपक्ष - 03

EXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...