विधानसभेची रंगत वाढणार, संभाजी ब्रिगेडनेही जाहीर केली 15 उमेदवारांची यादी

विधानसभेची रंगत वाढणार, संभाजी ब्रिगेडनेही जाहीर केली 15 उमेदवारांची यादी

संभाजी ब्रिगेड या संघटनेनेही निवडणुकीत उडी घेतली आहे. तसंच 15 उमेदवारांची पहिली यादीदेखील जाहीर केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 ऑगस्ट : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. कारण संभाजी ब्रिगेड या संघटनेनेही निवडणुकीत उडी घेतली आहे. तसंच 15 उमेदवारांची पहिली यादीदेखील जाहीर केली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची 22 ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केलं असल्याचं औरंगाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितलं.

'आता स्वत:साठी लढणार...'

'संभाजी ब्रिगेड विधानसभा निवडणूक लढवणार आहे. 25 वर्ष दुसऱ्यांसाठी लढलो, आता स्वतःसाठी, जिंकण्यासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत. राज्यभर संपर्कप्रमुखांनी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला,' असं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे.

संभाजी ब्रिगेड कुणाच्या साथीने लढणार?

'सर्वच पक्षाबरोबर 'संभाजी ब्रिगेड'चे वरिष्ठ नेते चर्चा करत आहेत. सन्मानजनक जागा मिळाल्या तर ठीक अन्यथा स्वतंत्र स्वबळावर लढणार किंवा विविध समविचारी घटकांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी निर्माण करणार,' असं डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटलं आहे.

'संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहे,' अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

संभाजी ब्रिगेडची विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी :

1. कारंजा (वाशिम) माणिकराव महादेव पावडे

2. आर्वी) (वर्धा) अशिष नरसिंगराव खंडागळे

3. देवळी) (वर्धा) राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे

4. गडचिरोली (गडचिरोली) दिलीप किसनराव मडावी

5. ब्रह्मपुरी (चंद्रपूर) जगदीश नंदूजी पिलारे

6. वरोरा(चंद्रपूर) अरुण नामदेवराव कापडे

7. भोकर (नांदेड) भगवान भीमराव कदम

8. नांदेड उत्तर (नांदेड ) धनंजय उत्तमराव सूर्यवंशी

9. जिंतूर (परभणी) बालाजी माधवराव शिंदे

10. श्रीगोंदा(अहमदनगर) टिळक गोपीनाथराव भोस

11. उस्मानाबाद(उस्मानाबाद) डॉ.संदीप माणिकराव तांबारे

12. म्हाडा(सोलापूर) दिनेश गोपीनाथराव जगदाळे

13. सोलापूर उत्तर(सोलापूर) सोमनाथ विजय राऊत

14. पंढरपूर(सोलापूर) किरण शंकरराव घाडगे

15. तासगाव कवठेमहाकाळ (सांगली)ऋतुराज जयसिंगराव पवार

300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या