धावपटू कविता राऊत राजकारणाच्या मैदानात, 'या' पक्षाकडून लढून थेट माजी मंत्र्याच्या मुलीला देणार आव्हान?

धावपटू कविता राऊत राजकारणाच्या मैदानात, 'या' पक्षाकडून लढून थेट माजी मंत्र्याच्या मुलीला देणार आव्हान?

महाराष्ट्राची नावाजलेली धावपटू कविता राऊत ही राजकीय मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट : क्रीडापटू आणि राजकारण हे समीकरण देशाला नवं नाही. याआधीही अनेक क्रीडापटूंनी राजकीय मैदान गाजवलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. त्यानंतर महाराष्ट्राची नावाजलेली धावपटू कविता राऊत हीदेखील राजकीय मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे.

दिग्गज नेत्यांना आपल्याकडे खेचत भाजपने विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या या खेळीला आऊटगोईंग झालेल्या मतदारसंघात प्रत्युत्तर देण्यासाठी आघाडीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस सोडलेल्या आमदार निर्मला गावित यांच्याविरोधात धावपटू कवित राऊतला उतरवण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून सुरू आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाईम्स'ने वृत्त दिलं आहे.

कविता राऊत हिला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरीही कविताच्या राजकारणातील प्रवेशावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. 'उमेदवारीचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडून आलेला नाही. मात्र असा प्रस्ताव आल्यास जरूर सकारात्मक विचार करू,' अशी प्रतिक्रिया कविता राऊत हिच्या पतीने दिली आहे. त्यामुळे आगामी काळात धावपटू कविता राऊत राजकारणाच्या ट्रॅकवर धावल्यास आश्चर्य वाटायला नको.

निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

नंदूरबारमधून सलग 9 वेळा काँग्रेसच्या तिकीटवार निवडून आलेले माजी खासदार आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या आणि इगतपुरीच्या विद्यमान काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेसची साथ सोडली. काही दिवसांपूर्वीच निर्मला गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. परिणामी, या मतदारसंघात गावित यांना शह देण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आगामी काळात कवित राऊत काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार का, हे पाहावं लागेल.

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 10:08 AM IST

ताज्या बातम्या