अजित पवारांची धमकी खरी ठरली! शिवसेनेच्या मंत्र्याचा दारूण पराभव

अजित पवारांची धमकी खरी ठरली! शिवसेनेच्या मंत्र्याचा दारूण पराभव

अजित पवारांनी अखेर आपला शब्द खरा करून दाखवला आहे.

  • Share this:

पुरंदर, 24 ऑक्टोबर : निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्याविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. अजित पवार यांनी यावेळी शिवतारेंना खुलं आव्हानच दिलं होतं. 'शिवतारे तू परत आमदारच होऊन दाखव,' असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांनी अखेर आपला शब्द खरा करून दाखवला आहे. कारण काँग्रेसच्या संजयकाका जगताप यांनी विजय शिवतारे यांचा दारूण पराभव केला आहे.

पुरंदर मतदारसंघातून दोन वेळा विजयी झालेल्या शिवना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी 31 हजार मतांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिवे ते सासवडपर्यंत जल्लोष पूर्ण मिरवणूक काढली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली.

काय म्हणाले होते अजित पवार?

विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली होती. तसंच सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी शिवतारेंना थेट आव्हान दिलं.

'या निवडणुकीत प्रत्येकजण बारामतीत येवून आमच्यावर टीका करत आहे. आता विजय शिवतारेंनी फक्त आमदारच होवून दाखवावं. अख्या महाराष्ट्राला माहीत आहे की, मी एकदा ठरवलं तर त्या व्यक्तीला पाडतोच,' असं म्हणत अजित पवारांनी शिवसेनेच्या विजय शिवतारेंना एकप्रकारे धमकीच दिली होती.

LIVE VIDEO : धनंजय मुंडे झाले भावुक, कार्यकर्तेही जल्लोष करत रडले

Published by: Akshay Shitole
First published: October 24, 2019, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading