शरद पवारांनी मैदान गाजवलं, पण 'हा' निष्ठावंत शिलेदार पराभूत

शरद पवारांनी मैदान गाजवलं, पण 'हा' निष्ठावंत शिलेदार पराभूत

श्रीनिवास पाटील यांनी या निवडणुकीत मोठ्या फरकाने बाजी मारत सातारा हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलं.

  • Share this:

सातारा, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण त्याचवेळी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीनेही राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांचं या निवडणुकीत काय होणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला आणि उदयनराजेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी या निवडणुकीत मोठ्या फरकाने बाजी मारत सातारा हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलं.

सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय झाल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला गड राखल्याचं बोललं जात आहे. मात्र हा गड राखताना पवारांना आपला सिंह गमवावा लागला. कारण साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवणुकीत पराभव झाला आहे. कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला.

दरम्यान, सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव करत राष्ट्रवादी श्रीनिवास पाटील जाएंट किलर ठरले आहेत. उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता पाहता त्यांचा पराभव कठीण मानला जात होता. मात्र उदयनराजेंचा पक्षांतराचा निर्णय लोकांना पसंत पडला नसल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'सातारा गादीबद्दल जनतेला आदर आहे. पण उदयनराजे भोसले यांनी गादीची प्रतिष्ठा राखली नाही. मी उद्या इतर दौरे रद्द करून साताऱ्याला जाऊन राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जनतेचं आभार मानणार आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणूक निकाल आकडेवारी

उदयनराजे भोसले(भाजप)- 546903

श्रीनिवास पाटील(राष्ट्रवादी)-636620(विजयी)

मताधिक्य-89717

उदयनराजे भोसले यांना विधानसभेनुसार मिळालेली मते

256 वाई-95644

257 कोरेगाव-101638

259 कराड उत्तर-63762

260 कराड दक्षिण-81701

261 पाटण-84489

262 सातारा-118898

पोस्टल-2771

श्रीनिवास पाटील यांना विधानसभेनुसार मिळालेली मते

256 वाई-122707

257 कोरेगाव-95953

259 कराड उत्तर-114641

260 कराड दक्षिण-113550

261 पाटण-112348

262 सातारा-72864

पोस्टल-4557

VIDEO : 'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या