उदयनराजेंना दिल्ली दूर करणाऱ्या श्रीनिवास पाटलांची पहिली प्रतिक्रिया

उदयनराजेंना दिल्ली दूर करणाऱ्या श्रीनिवास पाटलांची पहिली प्रतिक्रिया

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना धोबीपछाड देत 60 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना धोबीपछाड देत 60 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. श्रीनिवास पाटील यांची आता विजयाकडे कूच सुरू असल्याची स्थिती आहे. यानंतर आता पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'शरद पवारांना अंतर देणाऱ्यांना लोकांनी उत्तर दिलं आहे. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही उमेदवारी लोकांनी उचलली. लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. भविष्यात साताऱ्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,' असं श्रीनिवास पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे कल आणि निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सातारा गादीबद्दल जनतेला आदर आहे. पण उदयनराजे भोसले यांनी गादीची प्रतिष्ठा राखली नाही. मी उद्या इतर दौरे रद्द करून साताऱ्याला जाऊन राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जनतेचं आभार मानणार आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नवी पिढी राज्यात राजकारणात आम्ही उभी करणार आहोत. मी स्वत: उद्यापासून युवा नेतृत्वासाठी राज्यभर फिरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक दिवाळी झाल्यावर होईल. पुढच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मित्र पक्षांचीही बैठक होईल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

- पक्षांतर करणाऱ्या लोकांना जनतेने स्वीकारले नाही

- सत्तेचा उन्माद लोकांना पसंत पडत नाही

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुतीने 162 जागांवर आघाडी घेतली होती. महाआघाडीने 97 जागांवर आघाडी घेत गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जोरदार कमबॅक केले आहे. निवडणुकीत वंचित आणि मनसे यांचा फार प्रभाव दिसल्याचे दिसला नाही.

LIVE VIDEO : धनंजय मुंडे झाले भावुक, कार्यकर्तेही जल्लोष करत रडले

First published: October 24, 2019, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading