राज ठाकरेंचा नवा पॅटर्न, सभा रद्द होऊ नये म्हणून शोधली युक्ती

रस्त्यावर सभांसाठी 'मनसे' आग्रही, सभांमुळे वाहातुकीचा बोजवारा उडणार.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 10:44 AM IST

राज ठाकरेंचा नवा पॅटर्न, सभा रद्द होऊ नये म्हणून शोधली युक्ती

मुंबई, 11 ऑक्टोबर: निवडणुकीच्या रणधुमाळीत सभांचा धडका सुरू झाला आहे. त्यामुळे आधीच मैदान मिळत आणि मैदान मिळालं की पावसाचं धुमशान त्यामुळे मनसेनं नवी युक्ती शोधली आहे. प्रचारासाठी रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी मनसेनं निवडणूक आयोगाकडं मागितली आहे. पावसामुळं जाहीर सभा रद्द करण्याची निमुष्की मनसेवर आली होती. सभांसाठी मैदानं मिळत नसल्यानं मनसेनं ही मागणी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर पावसानं पाणी फेरलं. त्यावर आता मनसेनं नवा उपाय शोधला आहे. मतदानाला अवघे काही दिवस उरले असून परतीच्या पावसानं राजकीय पक्षांची चांगलीचं कोंडी केली. त्याचा पहिला फटका राज ठाकरेंच्या सभेला बसला. पावसामुळं पुण्याती राज ठाकरेंची पहिली सभा रद्द करावी लागली. त्यामुळचं मनसेनं रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. 'मध्य रात्री 12 ते पहाटे 4 अशा सभा घ्याव्या. सभा घेण्यासाठी रस्ते नाहीत', असं म्हणत मनसेच्या या मागणीवर पुणेकरांनी खास पुणेकर शैलीत प्रतिक्रिया दिली. तर मुंबईकरांना मात्र कोणतीचं हरकत नाही.

सततच्या वाहतूक कोंडीमुळं आधीच वाहन चालक हैराण झाले आहेत. तर तिकडे फूटपाथवर फेरीवाल्यांच्या साम्राज्यामुळं पादचाऱ्यांना वाट काढणं कठीण झालं आहे. अशातच रस्त्यावर सभांना परवानगी दिल्यास सर्वसामान्य नागरिकांची कोंडी होणार हे मात्र नक्की. त्यामुळे मनसेच्या या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...