लढत विधानसभेची : शिवाजीनगरमध्ये भाजपचा दबदबा कायम राहणार का?

लढत विधानसभेची : शिवाजीनगरमध्ये भाजपचा दबदबा कायम राहणार का?

2014 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळे लढले. भाजपकडून विजय काळे रिंगणात होते. त्यावेळी भाजपला अनुकूल वातावरण असल्याने ते विजयीही झाले. आता पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपचंच वर्चस्व राहणार का, याची चर्चा आहे.

  • Share this:

पुणे, 17 सप्टेंबर : 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळे लढले. भाजपकडून विजय काळे रिंगणात होते. त्यावेळी भाजपला अनुकूल वातावरण असल्याने ते विजयीही झाले. आता पुन्हा एकदा या मतदारसंघात भाजपचंच वर्चस्व राहणार का, याची चर्चा आहे.

पुणे शहराच्या मध्यावर असलेल्या या मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत. माजी खासदार अनिल शिरोळेंचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची नावं उमेदवारीच्या चर्चेत आहेत.

भाजप- शिवसेनेची युती असताना 1990 ते 2004 पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. 2009 ला विनायक निम्हण यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक जिंकली. आता विनायक निम्हण पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. त्यामुळे भाजप -शिवसेनेची युती झाली तर तेही इथून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल भोसलेंनी इथे निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेत पाठवलं. त्यानंतर मात्र अनिल भोसलेंचे पक्षात मतभेद झाले. त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले या भाजपच्या सहयोगी नगरसेविका बनल्या. या सगळ्या परिस्थितीमुळे अनिल भोसले हे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांशी अंतर राखून आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

महाराष्ट्राचा महासंग्राम : इगतपुरीत निर्मला गावितांच्या सेनाप्रवेशामुळे नवं वळण

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलाय. त्यामुळे इथून लढण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट इच्छुक आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या गिरीश बापट यांना या शिवाजीनगर मतदारसंघातून 77 हजार 982 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या मोहन जोशींना 48 हजार 450 मतं मिळाली. ही परिस्थिती या निवडणुकीत भाजपला अनुकूल ठरू शकते.

त्यातच लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही वंचित विकास आघाडी स्वतंत्रपणे लढली तर काँग्रेसचं नुकसान होऊ शकतं.

शिवाजीनगर विधानसभा निवडणुकीतलं मतदान 2014

विजय काळे, भाजप - 56 हजार 460

विनायक निम्हण, काँग्रेस - 34 हजार 413

==================================================================================

भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 04:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading