महाराष्ट्र जिंकण्यासाठी आज मोदी, अमित शहा मैदानात; सत्ताधारी विरोधकांमध्ये होणार टशन

मुंबईत सकाळीच सात वाजल्यापासून मुख्यमंत्री नरिमन पॉईंट परिसरात मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांशी संवाद साधत महायुती प्रचार करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 08:03 AM IST

महाराष्ट्र जिंकण्यासाठी आज मोदी, अमित शहा मैदानात; सत्ताधारी विरोधकांमध्ये होणार टशन

मुंबई, 13 ऑक्टोबर : महाराष्ट्रात आज रविवार सुट्टीच्या दिवशी विधानसभेचा सभांचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांसह एक डझनाच्यावर सत्ताधारी आणि विरोधक प्रमुख नेत्यांची राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विधानसभेसाठी सभा रोड शो होणार आहेत. मुंबईत सकाळीच सात वाजल्यापासून मुख्यमंत्री नरिमन पॉईंट परिसरात मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांशी संवाद साधत महायुती प्रचार करत आहेत. तर रात्री वर्सोवा इथे मुख्यमंत्री सभादेखील घेणार आहेत.

दुसरीकडे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग गोरेगाव इथे रोड शो तसंच मीरा-भाईंदर परिसरात सभा घेणार आहेत. राहुल गांधी हे मुंबईत दोन सभा घेणार असून चांदिवली धारावी इछे सभा होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा होणार असून जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदी काय बोलणार आहे याकडे लक्ष आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार औसा विधानसभेत निवडणूक लढवत आहे. नेमक्या याच मतदारसंघात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचे उमेदवारासाठी प्रचार सभा आयोजित केली आहे.

विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी नितीन गडकरी सभा घेत आहेत तर मराठवाड्यात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ प्रचारासाठी येणार आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने देखील प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रकाश आंबेडकर आज रविवार सुट्टीचा दिवस सादर कळम तुळजापूर करमाळा जामखेड अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त सहभाग घेणार असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या - चर्नीरोडमधील रहिवासी इमारमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा LIVE VIDEO

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर सकाळी 11 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. पावणेदहा वाजता शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन सभास्थळी येणार आहेत. शहा यांच्या सभेसाठी कोल्हापूर भाजपनं जोरदार तयारी केली असून शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित असणार आहेत. दरम्यान, कोल्हापूरमधील सभा झाल्यानंतर अमित शहा हे हेलिकॉप्टरने कराडला रवाना होणार असून कराड दक्षिणचे उमेदवार अतुल भोसले यांच्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी कराडमध्ये सभा घेतली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात शहा नेमकं काय बोलणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.

Loading...

इतर बातम्या - भाजप अध्यक्षांवर पवारांची घणाघाती टीका, म्हणाले '5 वर्षांपूर्वी अमित शहा...'

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा...

सकाळी ११ वाजता अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, दुपारी २ वाजता जालना जिल्ह्यातील घनसावंगी, संध्याकाळी ४ वाजता जळगाव जिल्हयात जामनेर आणि ६ वाजता चाळीसगाव येथे सभा घेणार आहेत.

उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, भोजपुरी सुपरस्टार निरहुआ आज नालासोपारात

महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची रंगत आता वाढू लागली असून, रविवारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी नालासोपारात येत आहेत. रविवारी एव्हरशाईन, पाण्याची टाकी येथून संध्याकाळी ५ वाजता निघणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्या रॅलीत सुप्रसिद्ध भोजपुरी स्टार निरहुआ हे देखील सहभागी होत आहेत.

इतर बातम्या- VIDEO : उदयनराजेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 07:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...