मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्या 'या' सूचना, शिवसेनेचं टेन्शन वाढणार

निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार की मागील निवडणुकीप्रमाणे सर्व पक्ष स्वबळाची वाट निवडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 10:58 AM IST

मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्या 'या' सूचना, शिवसेनेचं टेन्शन वाढणार

मुंबई, 4 सप्टेंबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. काही दिवसांतच निवडणूक आचारसहिंता लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशातच निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार की मागील निवडणुकीप्रमाणे सर्व पक्ष स्वबळाची वाट निवडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत 25 वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली. पण त्यानंतर सत्तास्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजपने युती केली. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप सेना युती होणार की नाही, याबाबतचा संभ्रम कायम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोणत्या अटींवर युती करायची याबाबत आपल्या पक्षातील नेत्यांना सूचना दिल्याची माहिती आहे. 'शिवसेनेसोबत युती करा, तडजोड नाही,' अशा थेट सूचना पंतप्रधान मोदींनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाईम्स'ने वृत्त दिलं आहे. मोदींच्या या सूचनांनंतर जागावाटपात भाजपने आक्रमक भूमिका घेत जास्त जागांची मागणी केल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात बळ दिलं जात आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हेदेखील मी पुन्हा येईल असं म्हणत मुख्यमंत्रिपदावर पुन्हा एकदा दावा सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून युतीतच संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Loading...

VIDEO: राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...