'...या लोकांची लायकी नाही',पंकजा मुंडेंचं अजित पवार-धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

'...या लोकांची लायकी नाही',पंकजा मुंडेंचं अजित पवार-धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

परळीतील वैजनाथ मंदिर आणि रस्ते विकास कामांच्या शुभारंभ सोहळ्यादरम्यान उपस्थितांसोबत संवाद साधताना पंकजा मुंडेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

  • Share this:

सुरेश जाधव

बीड, 30 ऑगस्ट : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचं रण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेदेखील कंबर कसून प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. परळीतील वैजनाथ मंदिर आणि रस्ते विकास कामांच्या शुभारंभ सोहळ्यादरम्यान उपस्थितांसोबत संवाद साधताना पंकजा मुंडेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

आधी तुमचा पक्ष वाचवा - पंकजा मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या की,'बारामतीतील नेते येऊन माझ्यावर आरोप करतात पंकजा मुंडेंना परळीचं ज्योतिर्लिंग वाचवता आलं का? तुमचं तुम्ही पाहा ना? आधी तुमचा पक्ष वाचवा, तुमच्या आजूबाजूला बसणारे उद्या कोणत्या पक्षाच्या मंचावर बसतील हे सांगता येत नाही, लागले टीका करायला' अशा शब्दात पंकजांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेत.

(वाचा : इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या,बॉलिवूडमध्ये करायचं होतं करिअर; पण...)

...या लोकांची लायकी नाही, पंकजा मुंडेंचं टीकास्त्र

'आम्ही दुष्काळमुक्त मराठवाडा करणारे आहोत, धरणात लघुशंका करण्याची भाषा बोलणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहेत. जे परळीचा नाला स्वच्छ करू शकले नाहीत... ते लोक धरणाची कामं  करणार आहेत का? या लोकांची लायकी नाही. लायकी नसणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्याची लायकी कमी होते. परळीचे लोक हुशार आहेत, लोकल निवडणुकीत लोकल नेत्याला पकडता आणि मोठ्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांना साथ देतात',  असं म्हणत पंकजांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं.

(पाहा : मंडळांनो, 'नवसाला पावणारा' जाहिरात करण्याआधी हा SPECIAL REPORT पाहाच!)

'मला संपूर्ण महाराष्ट्र बुक करायचाय!'

मी येथे परत येणार नाही असं नाही, तर आणखी मोठी होऊन येणार आहे. बस खूप झालं आता माझ्या लोकांची कामं करायची आहेत, पण माझ्या हातात शक्ती नसेल तर काम कसं करता येईल. हे दुसऱ्या लोकांना जमणार नाही मला फक्त परळीत यशस्वी होऊन जमणार नाही. तर मला बीड जिल्हा मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्र बुक करायचा आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताच सरकार आणायचं आहे, असे म्हणत मनातल्या मुख्यमंत्रिपदाची अपेक्षाही यावेळी पंकजांनी व्यक्त केली.

(वाचा : 'राष्ट्रवादी'वाले असेच येत राहिले तर भाजप चोरांचा पक्ष बनेल - प्रकाश आंबेडकर)

VIDEO : राणेंनी केलं जाहीर, 'या' तारखेला होणार 'भाजपवासी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 08:00 AM IST

ताज्या बातम्या