पंकजांचे थेट आव्हान.. खुद्द शरद पवार बीडमधून निवडणूक लढले तरी 'कमळ'च फुलेल!

पंकजांचे थेट आव्हान.. खुद्द शरद पवार बीडमधून निवडणूक लढले तरी 'कमळ'च फुलेल!

खुद्द शरद पवार यांनी बीडमधून निवडणूक लढवली तरी 'कमळ' फुलल्याशिवाय राहणार नाही, असे पंकजा यांनी म्हटले आहे.

  • Share this:

नाशिक,19 सप्टेंबर: भाजप नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आव्हान दिले आहे. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात धनंजय मुंडे यांना परळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून पंकजा मुंडे यांनी शरद पवारांवर टीका करत थेट त्यांनाच आव्हान दिले आहे. खुद्द शरद पवार यांनी बीडमधून निवडणूक लढवली तरी 'कमळ' फुलल्याशिवाय राहणार नाही, असे पंकजा यांनी म्हटले आहे.

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी पंकजा नाशिकमध्ये बोलत होत्या. पंकजा यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील गोरगरीब जनतेचे स्वप्न आहे. महाराष्ट्रात जातीपातीचे विष पेरण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले तर मोदींनी सामाजिक स्वच्छतेचे काम केले आहे.

परळीतून विजय निश्चित..

शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात धनंजय मुंडे यांना परळीतून उमेदवारी दिली आहे. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, या निवडणुकीची धास्ती नाही. उलट परळीतून माझा विजय निश्चित आहे. विरोधकांनीच धास्ती घेतल्याचे चित्र दिसत आहे. मी परळीतून विजयी झालेली आमदार आहे. त्यामुळे धास्ती वाटायचा प्रश्नच नाही. मागील 5 वर्षात मोठा निधी मतदारसंघात आणला. जिल्ह्यात विकासकामे केली आहेत. त्यामुळे परळीत आपलाच विजय निश्चित असल्याचा विश्वासही पंकजा यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.

पंतप्रधान मोदींचे कौतुक तर शरद पवारांवर हल्लाबोल...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिनाभरापासून काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरूवारी नाशिकमध्ये झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्राचे आख्ख मंत्रिमंडळ, सर्व आमदार, खासदार या सभेला उपस्थित होते. राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन नुकतेच भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगडी घालून सत्कार केला. यावेळी सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वाचे लोकप्रिय नेते असे कौतुक करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

VIDEO:मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला? फडणवीसांनी केला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या