पंढरपुरात महाआघाडीला फुटीचं ग्रहण, युतीला होणार का फायदा? पाहा SPECIAL REPORT

पंढरपुरात महाआघाडीला फुटीचं ग्रहण, युतीला होणार का फायदा? पाहा SPECIAL REPORT

मंगळवेढा मतदारसंघात आघाडीत बिघाडी, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आमनेसामने

  • Share this:

विरेंद्र उत्पात (प्रतिनिधी) पंढरपूर, 07 ऑक्टोबर: विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना मात्र आघाडीतील संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाआघाडीला फुटीचं ग्रहण लागलं आहे. या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहे. त्यामुळं आघाडीत बिघाडी अशी अवस्था झाली आहे.

मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार भारत भालकेंना राष्ट्रवादीनं या मतदारसंघातून उमेदवारी दिलीय.खरं तर हा काँग्रेसचा मतदारसंघ असल्यामुळं राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवाजी काळुंगे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलीय.त्यामुळं पंढरपुरात काँग्रेस- राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकलेत.

पंढपूरच्या जागेरून दोन्ही काँग्रेसमध्ये घमासान सुरू झालंय.उमेदवारीच्या मुद्दयावरुन काँग्रेस नेतेही इरेला पेटलेत. मंगळवेढा मतदारसंघात सेना-भाजप महायुतीनं सुधाकर परिचारकांना उमेदवारी देत विरोधकांना धक्का दिलाय. परिचारकांच्या उमेदवारीमुळं पंढरपूर मतदारसंघातील चुरस वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली असताना राष्ट्रवादीतून नाराजीचा सूर निघाला आहे. पैठण मतदारसंघातील माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. संजय वाघचौरे यांच्या एका समर्थकाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. युवराज चावरे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाचा पूर्ण नायनाट झाला असून आता त्याला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी वाचवता येणार नाही, अशा शब्दात एमआयएम(AIMIM)चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी(Asaduddin Owaisi) यांनी पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर टोला लगावला. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. यासाठी पक्षाच्या पहिल्या सभेत पुणे येथे ते बोलत होते.

युतीला टफ फाईट देण्यासाठी तरी आघाडीतील अंतर्गत कलह संपतात का? की आघाडीमधील कलहाचा फायदा युतीला होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 11:11 AM IST

ताज्या बातम्या