आघाडी की युती, तुमच्या भागात कुणाचं वर्चस्व? जाणून घ्या 6 विभागातील मतदारांचा कल

आघाडी की युती, तुमच्या भागात कुणाचं वर्चस्व? जाणून घ्या 6 विभागातील मतदारांचा कल

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला काही दिवस बाकी आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला काही दिवस बाकी आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे, तर युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील जनतेचा प्रत्यक्ष कौल जरी हाती असला नसला तरीही काही संस्थांनी ओपिनियन पोलच्या माध्यमातून वारं नेमकं कोणत्या दिशेने वाहतंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एबीपी आणि सी व्होटर यांचा ओपिनियन पोल समोर आला आहे.

एबीपी- सी व्होटरच्या ओपनियन पोलमध्ये कुठल्या भागात कुणाला किती जागा?

मुंबई

एकूण: 36

महायुती: 32

महाआघाडी: 4

अन्य: 0

कोकण

एकूण: 39

महायुती: 34

महाआघाडी: 4

अन्य: 1

मराठवाडा

एकूण: 47

महायुती: 25

महाआघाडी: 20

अन्य: 2

विदर्भ

एकूण: 60

महायुती: 39

महाआघाडी: 18

अन्य: 3

उत्तर महाराष्ट्र

एकूण: 36

महायुती: 21

महाआघाडी: 14

अन्य: 1

पश्चिम महाराष्ट्र

एकूण: 70

महायुती: 43

महाआघाडी: 26

अन्य: 1

मागच्या निवडणुकीत काय झालं?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

कोणत्या विभागात कोणत्या पक्षाची काय होती स्थिती?

पश्चिम महाराष्ट्र

एकूण जागा - 58

भाजप - 19

शिवसेना - 12

काँग्रेस - 7

राष्ट्रवादी - 16

इतर - 4

उत्तर महाराष्ट्र

एकूण जागा - 47

भाजप - 19

शिवसेना - 8

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 8

इतर - 2

मराठवाडा

एकूण जागा - 46

भाजप - 15

शिवसेना - 11

काँग्रेस - 9

राष्ट्रवादी - 8

इतर - 3

विदर्भ

एकूण जागा - 62

भाजप - 44

शिवसेना - 4

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 1

इतर - 3

कोकण

एकूण जागा - 75

भाजप - 25

शिवसेना - 28

काँग्रेस - 6

राष्ट्रवादी - 8

इतर - 8

2 तासांपासून प्रफुल पटेल यांची चौकशी, पाहा ईडी कार्यालयातून GROUND REPORT

Published by: Akshay Shitole
First published: October 18, 2019, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading