Elec-widget

जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आज होणार नितेश राणेंचा भाजप प्रवेश

जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आज होणार नितेश राणेंचा भाजप प्रवेश

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि पक्षातील काही दिग्गज नेत्यांचा विरोध यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळू शकला नाही.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 3 ऑक्टोबर : माजी मुख्यमंत्री आणि कोकणातील वजनदार नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत आहे. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि पक्षातील काही दिग्गज नेत्यांचा विरोध यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळू शकला नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वत: नारायण राणे यांचा भाजप प्रवेश होत नसला तरीही त्यांचे सुपुत्र नितेश राणे हे मात्र भाजपमध्ये दाखल होणार आहेत.

कणकवली येथील भाजप कार्यालयात नितेश राणे यांचा प्रवेश होणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल. तसंच नितेश राणे यांना उद्या भाजपाचा AB फॉर्म मिळण्याचीही शक्यता आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

नारायण राणे आणि राजकीय वर्चस्वाचा संघर्ष

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निलेश राणेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

Loading...

राज्यातील राजकारणात राणेंना दोन मोठे धक्के

कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली.

शिवसेना युतीत येताच राणे भाजपपासून दूर

मधल्या काळात शिवसेना सतत सत्तेविरोधात भूमिका घेत होती. अशातच भाजपनं कोकणात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणेंना जवळ केलं. पण नंतर मात्र लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती झाली. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेवर गेलेले नारायण राणे यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडलं.

राजकीय कमबॅकसाठी विजय आवश्यक

नितेश राणेंच्या भाजप प्रवेशानंतर कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

कुणा विरुद्ध कोण लढणार? या आहेत BIG FIGHTS, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...