Exit Poll 2019: उत्तर महाराष्ट्रात 'कमळ' फुलणार की 'आघाडी'चा सुपडा साफ होणार

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप-शिवसेना महायुतीला मोठे बहुमत

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 07:44 PM IST

Exit Poll 2019: उत्तर महाराष्ट्रात 'कमळ' फुलणार की 'आघाडी'चा सुपडा साफ होणार

मुंबई,21 ऑक्टोबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उत्साहात मतदान पार पडले. अनेक दिग्गजांची भवितव्य मतदान यंत्रात अर्थात EVM मध्ये बंद झाले आहे. राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 55.35 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारीत घट झाल्याचे समोर आले आहे. 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिला आहे, निकालाच्या दिवशी समोर येणार आहे. आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार, कोण बाज मारणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयाची पतका फडकावणार आहे. महायुती (भाजप-शिवसेना)-31, भाजप-18, शिवसेना-13, काँग्रेस-5 आणि राष्ट्रवादी- 1 जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, मागील विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससा यंदाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे.

2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र्य लढवली होती. निकाल पाहिले असता शिवसेना 07, भाजप 15, राष्ट्रवादी 05, काँग्रेस 07 तर अपक्ष 02 उमेदवार निवडून आले होते.

दरम्यान, 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

छगन भुजबळांचं मॅजिक चालणार..

Loading...

या पोलनुसार, येवल्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर छगन भुजबळांचं मॅजिक चाललं आहे. छगन भुजबळ आणि येवला मतदारसंघ हे अनेक वर्षांचं समीकरण आहे. पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला - लासलगाव मतदारसंघातून छगन भुजबळ हे सलग तीन वेळा निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्याच पक्षातले माणिकराव शिंदे यांनी त्यांना उमेदवारीसाठी आव्हान दिले आहे.

उत्तर महाराष्ट्र एकूण सीट 36

महायुती (भाजप-शिवसेना) - 31

भाजप-18

शिवसेना-13

काँग्रेस-5

राष्ट्रवादी-1

2014 निवडणूक

शिवसेना 07

भाजप 15

एनसीपी 05

काँग्रेस 07

अपक्ष 02

2009 निवडणूक

शिवसेना 07

भाजप 05

एनसीपी 09

काँग्रेस 06

सपा 01

अपक्ष 05

एमएनएस 03

एकूण जागा - 288

कोण किती लढतंय जागा...

भाजप - 164,

शिवसेना - 124,

काँग्रेस - 147,

राष्ट्रवादी - 121,

सपा - 7,

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 5.

वंचित बहुजन आघाडी - 235,

एम.आय.एम. - 44,

बहुजन विकास आघाडी - 31,

मनस - 105,

बसपा - 262,

आप - 24

कोण कोणाच्या विरोधात...

-मनसे 105 पैकी शिवसेने विरोधात 54 तर भाजप च्या विरोधात 51 जागा लढवत आहे

-भाजप 164 पैकी राष्ट्रवादीच्या विरोधात 60, काँग्रेसच्या विरोधात 94, अन्य विरोधात 10 जागा लढवत आहे

-शिवसेना 126 पैकी राष्ट्रवादीच्या विरोधात 57, काँग्रेसच्या विरोधात 52 तर अन्य विरोधात 15 जागा लढवत आहे,

-शिवसेना-भाजप राज्यात कणकवलीत एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 06:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...