साहेब...मरेपर्यंत तुमच्यासोबतच! तरुणाने शरद पवारांना चक्क बॉण्ड पेपरवर लिहून दिलं!

राष्ट्रवादीला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा सुरू केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 05:17 PM IST

साहेब...मरेपर्यंत तुमच्यासोबतच! तरुणाने शरद पवारांना चक्क बॉण्ड पेपरवर लिहून दिलं!

मुंबई, 23 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं. त्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा सुरू केला आहे.

शरद पवार यांच्या दौऱ्याला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पवारांच्या दौऱ्यात तरुणांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. त्यातच आता मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांने तर चक्क बॉण्ड पेपरच्या माध्यमातून त्याची पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे.

'तुम्ही महाराष्ट्रासाठी विविध क्षेत्रात केलेलं काम आणि तुमचा पुरोगामी विचार मी नेहमीच माझ्या आसपासच्या लोकांमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. मी शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे,' असं या तरुणाने शरद पवार यांना बॉण्ड पेपरवर लिहून दिलं आहे.

पवारांचा झंझावाती महाराष्ट्र दौरा

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधीही राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात मोठे धक्के बसले. 'शरद पवार आमच्या ह्रदयात आहेत. पण मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सत्ताधारी पक्षात जात आहोत,' असं म्हणत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी साथ सोडली. त्यानंतर आता शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे.

Loading...

पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासोबत रोड-शोच्या माध्यामातून शरद पवार पुन्हा एकदा जनतेला साद घालत आहेत. भाजपच्या आक्रमक राजकारणाला उत्तर देण्यासाठी पवार सज्ज झाले आहेत. यामध्ये त्यांना कितपत यश मिळतं, हे तर निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...