Elec-widget

गिरीश महाजनांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला की काय, राष्ट्रवादीचा टोला

गिरीश महाजनांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला की काय, राष्ट्रवादीचा टोला

भाजपने स्थानिक भूमीपूत्राला उमेदवारी न देता बाहेरून आलेल्या उमेदवाराला आयात करून उमेदवारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

  • Share this:

राजेश भागवत,(प्रतिनिधी)

जळगाव,11 ऑक्टोबर: अमळनेर तालुक्यातील मतदारांमध्ये भाजप विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भाजपने स्थानिक भूमीपूत्राला उमेदवारी न देता बाहेरून आलेल्या उमेदवाराला आयात करून उमेदवारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. गिरीश महाजन यांनी 244 जागांपेक्षा जास्त येथील असे म्हटले होते. यावर जयंत पाटील म्हणाले की, गिरीश महाजन मोठे भविष्यकार आहेत. त्यांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला की काय, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेरचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे खान्देशी अहिराणी भाषेत आवाहन केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ मोठी सभा घेण्यात आली. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल मिटकरी, माजी विधानपरिषद सभापती अरुणभाई गुजराथी यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या मतदारांना अहिराणी भाषेत आवाहन केले की, भाजपने स्थानिक भूमीपूत्राला उमेदवारी न देता बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. आज आपल्या तालुक्याचं नाव हे बदनाम झालं आहे. अमळनेर बिकानेर झालं आहे अशी आपल्या तालुक्याची ओळख आहे आणि ही ओळख आपल्याला बदलायची आहे. जर अमळनेरात विकास हवा असेल तर येथील स्थानिक भूमीपुत्राला निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी मतदारांना केले.

जयंत पाटील यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. नारायण राणे यांच्या स्वाभिमान खूप मोठा आहे. परंतु भाजपने त्यांचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यांना जी वागणूक दिली त्यावरून आपल्याला कळते की, नेमके भाजप नेत्यांना कशी अपमानास्पद वागणूक देत असते. अमळनेरात देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून त्यांना उमेदवारी न देता स्थानिक भूमीपूत्राला उमेदवारी न देता आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने येथील कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक आमदार असला पाहिजे म्हणून सर्व आमच्यासोबत आहेत. तसेच गिरीश महाजन यांनी 244 जागांपेक्षा जास्त येथील असे म्हटले होते. यावर जयंत पाटील म्हणाले की, गिरीश महाजन मोठे भविष्यकार आहेत. त्यांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला की काय, परंतु त्यांना महाराष्ट्राची आताची स्थिती माहीत नाही. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचीच सत्ता या राज्यात येणार आहे. एवढी मोठी विराट सभा अजून महाराष्ट्रमध्ये कुठेच झाली नाही. त्यामुळे अरुण पाटील हे नक्कीच निवडून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Loading...

'नागपूरकराने पवारांची काय अवस्था केली, त्यांना आता...' मुख्यमंत्र्यांची खरमरीत टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...