सत्ता स्थापनेविषयी पवारांची भविष्यवाणी, वाद सोडवण्यासाठी दिला पर्याय!

सत्ता स्थापनेविषयी आमच्यासमोर कुठलाही प्रस्ताव नाही. कोणीही आमच्याशी बोलले नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर आम्ही विरोधी पक्षातच असणार आहोत या भूमिकेवर पवारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 01:08 PM IST

सत्ता स्थापनेविषयी पवारांची भविष्यवाणी, वाद सोडवण्यासाठी दिला पर्याय!

विनया देशपांडे, प्रतिनिधी

मुंबई, 01 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मोठा संघर्ष सुरू आहे. अशात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली असताना सत्ता स्थापनेविषयी उद्धव ठाकरे यांनी आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्याशीही कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या खुलाश्यामुळे आता राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

सत्ता स्थापनेविषयी आमच्यासमोर कुठलाही प्रस्ताव नाही. कोणीही आमच्याशी बोलले नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर आम्ही विरोधी पक्षातच असणार आहोत या भूमिकेवर पवारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान, काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. यावर माझा काँग्रेसवर विश्वास आहे. ते शिवसेनेला कधीही पाठिंबा देणार नाहीत असा आत्मविश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे खरंतर शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्ह आहेत.

दरम्यान, सत्तेसाठी सध्या दोन्ही पक्ष वाद घालत असेल तरी जो पक्ष दमेल त्याला नमतं घ्यावं लागेल. सत्तास्थापनेसाठी भाजपकडे पर्याय नाही. भाजपने कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरलं तरी ते बहुमताचा आकडा पार करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे मुद्दे मान्य करावे लागतील असं शरद पवारांनी सांगितलं आहे. खरंतर पवार हे राजकीय डावपेचांसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा हा अंदाज किती खरा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातम्या - सेनेचं सरकार स्थापनेचं स्वप्न भंगणार, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिला धक्का

Loading...

तर 'आम्हीही बहुमताचा आकडा गाठू शकतो. आता लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार,' अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून माझं बोलणं झालेलं नाही. फक्त आम्ही 3 महिन्यांपूर्वी संसदेत बोललो होतो. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट भूमिका घेतली आहे की आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसऱ्या कोणाशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाही,' असं CNN News18 सोबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या - 'काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करू शकते?'

'मतमोजणीच्या दिवशी मला सोनिया गांधी यांचा फोन आला होता. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी कोणतंही संभाषण नाही. आमच्यामध्ये देशातील आर्थिक अस्थिरतेबाबत चर्चा झाली आहे. त्याबाबतच मी 3 नोव्हेंबरला दिल्लीला जाणार आहे,' अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी शिवसेना किंवा भाजपला पाठिंबा देण्याची चर्चा नाकारल्याने पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलली आहेत. तसंच आपला मुख्यमंत्री करण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षेलाही धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते. अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. इतर बातम्या -

इतर बातम्या - 'लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार'; राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपला धडकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...