सततच्या धक्क्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन पलटवार' तयार, या 5 मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू

सतत होणाऱ्या आऊटगोईंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतेत आहे. हीच चिंता दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने नवी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 10:21 AM IST

सततच्या धक्क्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन पलटवार' तयार, या 5 मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू

मुंबई, 25 ऑगस्ट :  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला चितपट करून लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. मात्र सतत होणाऱ्या आऊटगोईंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतेत आहे. हीच चिंता दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने नवी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांची अनेकदा चर्चा होते. पण आता पवारांना पुन्हा शह देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि काही नेते गळाला लावले आहेत. त्यामुळे पक्ष सोडलेल्या नेत्यांना दणका देण्यासाठी पवारांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचाच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे.

कोणत्या मतदारसंघात सुरु आहेत राष्ट्रवादीच्या हालचाली?

1. शिवेंद्रराजे भोसले

Loading...

सातारा जिल्हा हा खरंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण यंदाच्या निवडणुकीत साताऱ्याचा गड राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. शिवेंद्रराजेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने विशेष प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.

2. रश्मी बागल

करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मागील निवडणुकीत शिवसेनेकडूनच रश्मी बागल यांचा निसटता पराभव झाला होता. पण यावेळी रश्मी बागल यांनी थेट शिवसेनेतच प्रवेश केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून लढलेल्या संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी करमाळ्यातून उतरवण्याची शक्यता आहे.

3. राणाजगजितसिंह पाटील

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीने उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत तिकीट दिलं होतं. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर आता राणा पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. पाटील यांनी पक्ष सोडू नयेत, यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यानंतरीही जर राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याला गळाला लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.

4. दिलीप सोपल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली होती. त्याचवेळी सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला. या मेळाव्यानंतर दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा विचार ऐकून पक्षांतराबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती दिलीप सोपल यांनी 'News18 लोकमत'ला दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बाळराजे पाटील यांना संधी दिली जाऊ शकते किंवा भाजपच्या राजेंद्र राऊत यांना राष्ट्रवादी आपल्याकडे खेचू शकते.

5. बबनदादा शिंदे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतराचे वारे अतिवेगाने वाहत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अनेक नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या गोटात दाखल होत आहेत. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बबनदादा शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवाजी कांबळे यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात भाजपच्या खेळील उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातील तरुणांना अधिकाधिक संधी देण्याच्या विचारात आहे. मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.

अजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 10:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...