राष्ट्रवादीचे आणखी 20 उमेदवार जाहीर, विजयसिंह मोहिते पाटलांना शह देण्यासाठी टाकला डाव

राष्ट्रवादीने बेरजेचं राजकारण करत दुसऱ्या पक्षातील काही नेत्यांनाही संधी दिल्याचं दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 12:04 PM IST

राष्ट्रवादीचे आणखी 20 उमेदवार जाहीर, विजयसिंह मोहिते पाटलांना शह देण्यासाठी टाकला डाव

मुंबई, 3 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक उमदेवारांनी आपला अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बेरजेचं राजकारण करत दुसऱ्या पक्षातील काही नेत्यांनाही संधी दिल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने माळशिरस येथून धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना संधी दिली आहे. जानकर हे भाजपच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. पण विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीतून भाजपच्या जवळ गेल्याने त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने जानकरांना आपल्याकडे खेचलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपसमोर आव्हान निर्माण झालं आहे.

राष्ट्रवादीची दुसरी यादी, कुणाला मिळाली संधी?

जळगाव शहर - अभिषेक पाटील

बाळापूर - संग्राम गुलाबराव गावडे

Loading...

कारंजा - प्रकाश डहाके

मेळघाट - केवळराम काळे

अहेरी - धर्मरावबाबा आत्राम

दिग्रस - मो. तारीक मो. शमी

गंगाखेड - मधूसुदन केंद्रे

कन्नड - संतोष कोल्हे

नांदगाव - पंकज भुजबळ

बागलाण - दीपिका चव्हाण

देवळाली - सरोज अहिरे

कर्जत - सुरेश लाड

खेड आळंदी - दिलीप मोहिते

मावळ - सुनील शेळके

पिंपरी - सुलक्षणा शिलावंत

आष्टी - बाळासाहेब आजबे

म्हाडा - बबनदादा शिंदे

मोहोळ - यशवंत माने

माळशिरस - उत्तमराव जानकर

चंदगड - राजेश पाटील

उत्तमराव जानकर आणि लोकसभा निवडणूक

धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हेदेखील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण मी निवडणूक लढवणार नसून युतीच्या उमेदवाराला म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा नंतर उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली होती.

'माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्यामध्ये लढत झाली. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची चार लाख मते आहेत. त्यामुळे उत्तम जानकर यांचा पाठिंबा भाजपसाठी फायद्याचा ठरणार ठरला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीने खेळी खेळत उत्तम जानकर यांना आपल्याकडे खेचलं आहे. याचा राष्ट्रवादीला किती फायदा होतो, हे पाहावं लागेल.

कुणा विरुद्ध कोण लढणार? या आहेत BIG FIGHTS, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...