माढ्यातही 'नगर पॅटर्न'? संजय शिंदेंबाबतची राजकीय चर्चा राष्ट्रवादीसाठी धोक्याची

माढ्यातही 'नगर पॅटर्न'? संजय शिंदेंबाबतची राजकीय चर्चा राष्ट्रवादीसाठी धोक्याची

माढ्याच्या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपने बाजी मारली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

  • Share this:

सोलापूर, 19 जुलै : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ चांगलाच गाजला. कारण भाजप आणि राष्ट्रवादीने माढ्याची लढाई प्रतिष्ठेची केली होती. माढ्यात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार होते.

माढ्याच्या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपने बाजी मारली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता विधानसबा निवडणुकीआधीही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कारण लोकसभेला पराभूत झालेले संजयमामा शिंदे आता विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

संजयमामांची विधानसभा एण्ट्री आणि राष्ट्रवादीचा धोका

संजयमामा शिंदे विधानसभेसाठी करमाळा मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतचे संकेतही दिले होते. पण करमाळ्यात राष्ट्रवादीकडून रश्मी बागल यादेखील उत्सुक असल्याची चर्चा आहे. अशातच जर संजयमांमानी विधानसभा लढण्याचा निर्णय घेतल्यास करमाळ्यातील तिकीटावरून राष्ट्रवादीतच स्पर्धा निर्माण होऊ शकते.

संजयमामा शिंदे लोकसभेवर निवडून गेले असते तर करमाळ्यात पक्षांतर्गत स्पर्धा झाली नसती. पण आता एकाच तालुक्यात दोन इच्छुक तयार होत असल्याने राष्ट्रवादीची मात्र अडचण झाली आहे. त्यामुळे ज्याला तिकीट नाकारलं जाईल, तो शिवसेना किंवा भाजपमध्ये तर जाणार नाही ना, याचाही विचार राष्ट्रवादीला करावा लागेल. त्यामुळे आगामी काळात संजयमामा शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

नगरमध्ये काय आहे चर्चा?

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा करत या मतदारसंघात संग्राम जगताप यांना तिकीट दिलं होतं. पण आता हेच संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार जगताप शिवसेनेत प्रवेश करू शकतात. याबाबत 'हिंदुस्तान टाईम्स' या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिलं आहे.

शिवसेना प्रवेशावर काय म्हणाले संग्राम जगताप?

संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना स्वत: जगताप यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी राष्ट्रवादीसोबत असून माझा शिवसेना प्रवेश या फक्त अफवा आहेत, असा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.

वडिलांसमोर मुलाने धावत्या लोकल समोर मारली उडी, ठाणे स्टेशनवरचा LIVE VIDEO

First published: July 19, 2019, 7:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading