शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक राष्ट्रवादी सोडण्याच्या स्थितीत, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक राष्ट्रवादी सोडण्याच्या स्थितीत, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

कार्यकर्त्यांशी संवाद साधत राणा पाटील आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील, हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 30 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक आमदार राणा जगजीतसिंह पाटील राष्ट्रवादी सोडणाच्या तयारीत आहेत. तसंच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यासाठी आमदार राणा पाटील 31 ऑगस्ट रोजी खुला संवाद साधणार आहेत. 'मला तुमच्याशी काही बोलायचं आहे,' असं म्हणत राणा पाटील यांनी उस्मानाबादमध्ये पोस्टर्सही लावले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधत राणा पाटील आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील, हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

राणा पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांच्या सर्वात जुन्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत. याआधी शरद पवार यांच्या राजकीय चढउताराच्या काळात पद्मसिंह पाटील यांनी त्यांना साथ दिली होती. यावेळी मात्र त्यांचा पुत्र वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

दरम्यान, राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीनं उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांतच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सुरू झाली होती.

गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, सचिन अहिर या बड्या नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे. तसंच नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे मोठे नेते गणेश नाईक हेदखील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी अडचणीत आली आहे.

नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचीच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.

VIDEO : राणेंनी केलं जाहीर, 'या' तारखेला होणार 'भाजपवासी'

First published: August 30, 2019, 8:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading