'मला तोंड उघडायला लावू नका, नाही तर...', सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटील यांना दिला इशारा

'मला तोंड उघडायला लावू नका, नाही तर...', सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटील यांना दिला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना जाहीर सभेतच खडेबोल सुनावले आहेत.

  • Share this:

रायचंद शिंदे

पुणे, 15 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना जाहीर सभेतच खडेबोल सुनावले आहेत. पुण्यामध्ये झालेल्या जाहीरसभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी पाटील यांना थेट इशाराच दिला. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी अगदी प्रामाणिकपणे काम केल्याची कबुली खासदार सुळेंनी दिली. मात्र पुढील काळात असं काय घडलं कळलंच नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करून ते टीका करत राहिले, असंही विधान त्यांनी यावेळेस केलं.

सुप्रिया सुळे, राहुल गांधी आणि हर्षवर्धन पाटील यांची दिल्लीत बैठक झाली असे सांगत पाटलांनी राष्ट्रवादीवर टीका केली. पण आमच्या तिघांची बैठक कधीच झाली नाही, असा गौप्यस्फोटच सुळेंनी केला. पुढे त्या असंही म्हणाल्या की, 'खोटं बोलून टीका करू नका. मला तोंड उघडायला लावू नका नाहीतर तुमच्या अडचणी वाढतील', अशा थेट शब्दांत सुळे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीरपणे पाटील यांना इशारा दिला. शनिवारी (14 सप्टेंबर)पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात सणसवाडी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी भाजपासह हर्षवर्धन पाटलांचाही चांगलाच समाचार घेतला.

(वाचा : उदयनराजेंना भाजपात सामावून घेण्याचं 'हे' आहे मुख्यमंत्र्यांचं कारण!)

सुप्रिया सुळेंच्या भाषणातले अन्य मुद्दे:

1. हर्षवर्धन पाटलांचे भांडण राष्ट्रवादी बरोबर होतं मग काँग्रेस का सोडली? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. पुढे त्या असंही म्हणाल्या की, मी इंदापुरात जाहिरपणे बोलणार असून मी कोणाच्या बापाला घाबरत नाही.

(वाचा :उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण...!)

2. मुख्यमंत्री उत्तर द्या.. राष्ट्रवादीचे आमदार हे अलिबाबा आणि चाळीस चोर आहेत, असं म्हणाले होतात. आता त्यापैकी पाच चोर तरी तुमच्या पक्षात आहे अशी कुठली वाशिंग पावडर आहे ते स्वच्छ झाले? कोण चोर? ते स्पष्ट करा.

(वाचा :भाजपचं उपरण पाहताच इंदुरीकर महाराजांनी का लावले कानाला हात?)

VIDEO : कसं काय 'राजे' खरं हाय का? 'ईव्हीएम'चं आता बरं हाय का?

Published by: Akshay Shitole
First published: September 15, 2019, 6:49 AM IST

ताज्या बातम्या