राष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही!

राष्ट्रवादीचा हा नेता म्हणाला.. जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही!

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा शनिवारी किल्ले रायगडावर समारोप झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर शिवस्वराज्य यात्रा महाडमध्ये पोहोचली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी शिवसेनेसह भाजपवर सडकून टीका केली.

  • Share this:

मोहन जाधव,(प्रतिनिधी)

रायगड,21 सप्टेंबर:राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा शनिवारी किल्ले रायगडावर समारोप झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर शिवस्वराज्य यात्रा महाडमध्ये पोहोचली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी शिवसेनेसह भाजपवर सडकून टीका केली. तसेच जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही, असे आवाहनही खासदार कोल्हे यांनी जनतेला केले.

महाडमध्ये आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी युती सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळी महाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. महाड शहरातील शिवाजी चौक येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युती सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचत आमदार जयंत पाटील यांनी सरकारला टार्गेट केले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आपल्या अनोख्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

सर्व पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. आता न केलेल्या जाहिराती दाखवून हे सरकार दिशाभूल करत आहे. त्यामुळे जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाडमध्ये मतदारांना केले आहे.

'बाप सरदार असला म्हणून मुलगा सरदार व्हायला पाहिजे असं काही नसतं'

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेचे शनिवारी सकाळी जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे या दोघांनीही यावेळी शिवसेनेला टार्गेट केले.

बाप सरदार असला म्हणून त्याचा मुलगा सरदार व्हायला पाहिजे, असे काही नसतं, काळाच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता. त्या छत्रपतींची ही भूमी आहे, अशा खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर घणाघाती टीका केली.

दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम हे संभाव्य उमेदवार आहे. मतदारांनी याची काळजी करू नये, राष्ट्रवादीच्या वतीने मी शब्द देतो संजय कदम यांना निवडून द्या, मंत्री मंडळातील कदम स्थान आपण जाऊ देणार नाही, आमच्याकडून भास्कर जाधव गेलेत, सुनील तटकरे दिल्लीत आहेत. त्यामुळे संजय कदम यांना मंत्री बनण्यासाठी स्कोप असल्याचे त्यांनी संगितले.

भास्कर जाधवांनी आधी बोलायला हवं होतं- जयंत पाटील

जयंत पाटील यांनी सांगितले की, भास्कर जाधव आपले जवळचे मित्र होते. ते का जातायत याबाबत त्यांनी आधी आपल्याला बोलायला हवं होतं. ते पक्ष सोडून का गेले याचं कारण आपल्यालाही समजले नाही.

शिवसेनेने कोकणाला काय दिलं?

काळाच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता. त्या छत्रपतींची ही भूमी आहे. खेडवासियांनी याचा विचार करावा, आपल्या अडचणीत साथ देतो त्याला आपण साथ द्यायची की वरून आलेले पार्सल आपण डोक्यावर घेऊन मिरवायचं याचाही विचार मतदारांनी करावा, असे बोलून रामदास कदम यांचे चिरंजीव आणि दापोली मतदार संघातून सेनेचे संभाव्य उमेदवार योगेश कदम यांच्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली. शिवसेनेने कोकणाला काय दिलं, हा सवाल या निवडणुकीत त्यांना विचारा, या मतदार संघात बाराशे कोटींची विकास कामे आणली, असे शिवसेनेचे मंत्री म्हणतात, हे जनतेला मान्य आहे का,असा प्रश्न शिवसेनेला विचारावा, असे आवाहनही खासदार कोल्हे यांनी यावेळी केले आहे.

अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: September 21, 2019, 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading